Pune: काय सांगता! पुण्यातील 32 गावं विकणे आहेत; गावकऱ्यांनीच काढली जाहिरात; कारण काय?

Villages in Pune for sell : एकाच चर्चेला तोंड फुटले आहे. गावकऱ्यांनी असे बॅनर का लावले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुण्यात सध्या याच विषयाची चर्चा आहे.
pune municipal corporation
pune municipal corporation
Updated on

Pune News: पुण्यातील लोकांची निषेध करण्याची तऱ्हा वेगळी आहे. याचीच प्रचिती पुन्हा आली. पुणे जिल्ह्यातील ३२ गावांमध्ये 'गाव विकणे आहे' अशा मजकुराचे बॅनर लागले आहेत. त्यामुळे एकाच चर्चेला तोंड फुटले आहे. गावकऱ्यांनी असे बॅनर का लावले? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. पुण्यात सध्या याच विषयाची चर्चा आहे.

गावकऱ्यांनी लावलेल्या बॅनरवरून दिसतंय की, गावकरी पुणे महानगर पालिकेवर नाराज आहेत. बॅनरवर असं लिहिण्यात आलंय की, पुणे महानगर पालिकेचा जुलमी कर भरू शकत नाही. याचा अर्थ पाकिलेकडून आकारल्या जाणाऱ्या करामुळे ते संतापले आहेत. याच रागातून त्यांनी आपली ३२ गावे विकायला काढली आहेत. 'साम टीव्ही'ने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

pune municipal corporation
PM Modi Pune Visit: सिव्हिल कोर्टवरुन स्वारगेटला किती मिनिटांत पोहचणार? पंतप्रधान करणार अंडरग्राउंड मेट्रोचे उद्घाटन

नेमकं प्रकरण काय?

पुण्यातील धायरी, नऱ्हे, आंबेगाव, किरकटवाडी, नांदोशी, खडकवासला नांदेड, उत्तमनगर, शिवणे, कोंढवे, कोपरे अशा ३२ गावांमध्ये ठिकठिकाणी अशा प्रकारचे बॅनर लावण्यात आले आहेत. या गावांचा पुणे महापालिकेमध्ये समावेश झालेला आहे. पण, इथे विकासकामे झालेली नाहीत. त्यामुळे गावकरी संतप्त झाले आहेत. आम्ही पालिकेचा जुलमी कर भरू शकत नाही, त्यामुळे महापालिकेने आम्हाला विकत घ्यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.

पुणे महापालिकेचा निषेध म्हणून गावकऱ्यांनी ठिकठिकाणी असे बॅनर लावले आहेत. पुणे महापालिका आम्हाला कोणत्याही प्रकारची सुविधा पुरवत नाही. पण, टॅक्स मात्र भरमसा आकारला जातो. आमची कर भरण्याची क्षमता नाही. त्यामुळे आमचे सर्व गावच विकत घ्या,अशी उद्विग्न भावना गावकऱ्यांची झाली आहे.

pune municipal corporation
Pune Accident: जुलूस मिरवणुकीत झेंडा फडकवताना दोघांना विजेचा झटका; एकाचा मृत्यू, वडगाव शेरीतील घटना

गावकऱ्यांनी पुणे महापालिकेचा निषेध म्हणून हे बॅनर लावले आहेत. पाकिलेने याचे गांभीर्य लक्षात घेऊन काही पाऊलं उचलली नाहीत, तर आंदोलन अधिक तीव्र केले जाईल असा इशारा गावकऱ्यांनी दिला आहे. या ३२ गावाच्या गावकऱ्यांनी स्थापन केलेली समिती चांगलीच आक्रमक झाली आहे. त्यामुळे यावर पुणे महापालिका कसा प्रतिसाद देते हे पाहावं लागणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.