पुणे - सप्टेंबर महिना सुरु झाला की पुणे जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग कमी होईल, कोरोनाची साखळी तुटेल, अशी अटकळ बांधली जात होती. पण ही अटकळ पहिल्याच दिवशी सपशेल खोटी ठरली आहे. काल (ता.१) जिल्ह्यात ३ हजार ४१३ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे सप्टेंबरची सुरुवातच दिवसभरातील नवीन साडेतीन हजार रुग्णांनी झाली आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना संसर्गाची साखळी अद्यापही कायम असल्याचे स्पष्ट झाले आहे.
काल दिवसभरात आढळून आलेल्या एकूण रुग्णांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक १ हजार ६५५ रुग्ण आहेत. शहरातील सर्वाधिक रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमध्ये ९६६, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ५७३, नगरपालिका क्षेत्रातील १६५ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील ३४ रुग्णांचा समावेश आहे.
गेल्या चोवीस तासांत ५६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे शहरातील सर्वाधिक २८ रुग्ण आहेत. पिंपरी चिंचवडमधील ८, जिल्हा परिषद क्षेत्रातील १६, नगरपालिका ३ आणि कॅंटोन्मेंट बोर्डाच्या कार्यक्षेत्रातील एका रुग्णाचा समावेश आहे. नवे रुग्ण आणि रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ही सोमवारी (ता. ३१) रात्री ९ वाजल्यापासून काल (ता. १) रात्री नऊ वाजेपर्यंतची आहे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
यामुळे आतापर्यंतच्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या १ लाख ७३ हजार ७४७, कोरोनामुक्त रुग्णांची संख्या १ लाख ३५ हजार ३९ तर रुग्णांच्या मृत्यूंची संख्या ४ हजार १८३ झाली आहे. मृत्यू झालेल्यांमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील १२१ रुग्ण आहेत. दरम्यान,दिवसभरात २ हजार ४३८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.