Pune Festival 2023 : पुणे फेस्टिव्हलचा सोहळा आजपासून रंगणार; कार्यक्रमांची रेलचेल

सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन आज (शुक्रवार, २२ सप्टेंबर) होणार आहे.
35th Pune Festival will be inaugurated today 22 September
35th Pune Festival will be inaugurated today 22 September
Updated on

35th Pune Festival Inauguration : सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी देणाऱ्या ३५ व्या पुणे फेस्टिव्हलचे उद्घाटन आज (शुक्रवार, २२ सप्टेंबर) होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता स्वारगेट येथील श्री गणेश कला क्रीडा रंगमंच येथे हा कार्यक्रम होणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते आणि उद्योगमंत्री उद्य सामंत यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्र होणार आहे. तर पुण्याचे पालकमंत्री चंद्रकात पाटील प्रमुख पाहुणे असतील.

खासदार रजनी पाटील, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, खासदार श्रीरंग बारणे, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी या देखील उपस्थित राहतील. यावेळी प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री हेमामालीनी या गणेश वंदना सागर करतील.

या कार्यक्रमात ज्येष्ठ अस्थिशैल्य विशारद पद्मविभूषण डॉ. के. एच संचेती यांनी जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येईल. तर संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक आणि अध्यक्ष संजय घोडावत यांना पुणे फेस्टिव्हल पुरस्कार दिला जाणार आहे.

35th Pune Festival will be inaugurated today 22 September
Video: भाजप कार्यालयात पंतप्रधानांचं भव्य स्वागत; मोदींनी झुकून व्यक्त केला महिलांप्रती आदर

तसेच यंदा शतकपूर्तीवर्ष साजरे करणाऱ्या गणेश मंडळांचा देखील यावेळी सन्मान केला जाणार आहे. यामध्ये खडक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, श्री त्रिशुंड गणपती विजय मंडळ ट्रस्ट, सदाशिवपेठ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यांचा समावेश आहे. महत्वाचे म्हणजे हा कार्यक्रम सर्वांसाठी मोफत असून 'सकाळ'च्या फेसबुक पेजवर सायंकाळी साडेचार वाजता लाईव्ह देखील पाहाता येईल.

35th Pune Festival will be inaugurated today 22 September
Sanatana Dharma: 'सनातन धर्म' वादाची सुप्रीम कोर्टाकडून दखल; तामिळनाडू सरकार अन् स्टॅलिन यांना पाठवली नोटीस

पुणे फेस्टिव्हलमध्ये काय पाहाता येईल?

या वर्षीच्या पुणे फेस्टिव्हलमध्ये भरगच्च कार्यक्रम ठेवण्यात आले आहेत. यामध्ये शुक्रवारी २२ सप्टेंबर, ऑल इंडिया मुशायरा. शनिवार २३ सप्टेंबर, गंगा बॅले - हेमा मालिनी. रविवार २४ सप्टेंबर, लाईव्ह म्युझिकल नाइट विथ सोनु निगम. सोमवार २५ सप्टेंबर ,जाणता राजा. मंगळवार २६ सप्टेंबर, मिस पुणे फेस्टिवर अशा कार्यक्रमांची मेजवानी पुणेकरांना अनुभवता येणार आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()