Crime News : खामगाव येथे ४ घरफोडी; २ लाख ७३ हजाराचा ऐवज लंपास

४ ठिकाणी झालेल्या घरफोडीमध्ये २ लाख ७३ हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे.
crime news theft
crime news theftsakal
Updated on

खुटबाव : खामगाव तालुका दौंड येथील गणेश नगर परिसरामध्ये ४ ठिकाणी झालेल्या घरफोडीमध्ये २ लाख ७३ हजाराचा ऐवज चोरीस गेला आहे. सदर घटना मंगळवार दिनांक २८ रोजी रात्री १०.३० ते बुधवार दिनांक २९ रोजी ते पहाटे ३.०० वाजेपर्यंत घडली आहेत. यासंदर्भात सचिन सुरेश नागवडे (वय ३४ वर्ष, राहणार खामगाव ,गणेश नगर तालुका दौंड ,जिल्हा पुणे )यांनी फिर्याद दिली आहे .नागवडे हे रात्री झोपले असताना शेजारी रामचंद्र नागवडे यांनी त्यांना त्यांच्या शेजारील खोलीमध्ये चोरी झाल्याची माहिती दिली.

crime news theft
Mumbai Crime News: अर्नाळा दुघटनेत एकाचा मृत्यू, वाचा नक्की कशी घडली घटना

नागवडे यांनी उठून पाहिले असता यामध्ये त्यांच्या कपाटातील रोख २५ हजार रुपये , प्रत्येकी अर्ध्या तोळ्याच्या २ लेडीज अंगठ्या, २ तोळे वजनाचे सोन्याचे गंठण, प्रत्येकी अर्धा तोळे वाजण्याच्या २ सोन्याच्या अंगठ्या ,लहान मुलाच्या कानातील बाळ्या, पेटीमध्ये ठेवलेले ३५ हजार रुपये चोरी झाल्याचे निदर्शनास आले. याचबरोबर चोरट्यांनी शेजारील प्रदीप बबन नागवडे यांचे ३ हजार रुपये, संतोष बाबुराव नागवडे यांची ३०० रुपये व अण्णासाहेब तुकाराम भालेराव यांची काळ्या रंगाची हिरो होंडा स्प्लेंडर गाडी(नंबर एम.एच.१४ बी एस ९३६०) चोरली आहे.

घटनेनंतर खामगावचे पोलीस पाटील प्रतिक जगताप यांनी यवत पोलिसांशी संपर्क केला. पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली श्वान पथक खामगाव येथे दाखल झाले व त्यांनी चोरट्यांचा माग घेतला. या सदर्भात अधिक तपास पोलीस हवालदार एस.बी. कदम करत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.