Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयत्याची दहशत, 'लग्नामध्ये नाचताना तरुणावर..'

लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून ४ जणांनी तरुणावर कोयत्याने केले वार
traffic due to bogus documents of contractor fraud crime pune
traffic due to bogus documents of contractor fraud crime puneesakal
Updated on

लग्नामध्ये नाचताना झालेल्या वादातून ४ जणांनी तरुणावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. लग्नाच्या वरातीत नाचताना झालेल्या वादाचा राग मनात ठेऊन 4 जणांनी तरुणाला बेदम मारहाण केली आहे. कोयत्यासह, हॉकी स्टिक आणि बांबूने तरुणाला मारहाण केली आहे.

पुण्यातील हडपसर परिसरातील घटना ही घटना आहे. तर हा संपूर्ण प्रकार 15 जानेवारी रोजी घडला आहे. अमरदिप जाधव (19) यांनी या प्रकरणी पोलिसात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुण हा सोलापूर जिल्ह्यात जेऊर या ठिकाणी डिसेंबर महिन्यात एका लग्नासाठी गेला होता.

हे ही वाचा : भारतीयांनी जगाला डिजिटल पेमेंट शिकवायची आलीये वेळ...

लग्नावेळी फिर्यादी तरुण आणि यातील मुख्य आरोपी अमरदिप जाधव हे दोघे ही नाचत होते. नाचताना या दोघांमध्ये भांडण झाले आणि याचा राग जाधव याच्या मनात होता. पुण्यात 15 जानेवारी रोजी जाधव यांच्यासह तीन जणांनी फिर्यादी तरुणाच्या डोक्यात कोयत्याने वार केले तसेच त्याला हॉकी स्टिक आणि बांबूने मारहाण केली आणि तिथून पसार झाले.

traffic due to bogus documents of contractor fraud crime pune
Nitin Deshmukh : ''... म्हणून मी कपडे घेऊन चौकशीला जात आहे''

सागर सुकळे (22) याच्यासह आणखी 3 अनोळखी तरुणांवर हडपसर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हडपसर पोलीस करत आहेत.

traffic due to bogus documents of contractor fraud crime pune
Pune Crime : पुणं हादरलं! अवघ्या 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार; आरोपी...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()