विश्रांतवाडी (पुणे) : लोहगावमधील मध्यवर्ती भागातील एका इमारतीमधील युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे तो राहत असलेल्या इमारतीमधील रहिवाशांची कोरोनाची चाचणी करण्यात आली आहे. या सर्वांना क्वारंटाइन करण्यात आले आहे.
लोहगावमध्ये दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. माळवाडी वस्तीवरील चार रुग्ण बरे होऊन घरी परतले. चार दिवसांपूर्वी संतनगरमधील युवकाला कोरोनाची लागण झाली होती. सुदैवाने त्याच्या संपर्कात आलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
लोहगावात मध्य वस्ती भागात एका मोठ्या इमारतीमध्ये राहणाऱ्या एका युवकाला कोरोनाची लागण झाली आहे. या रुग्णाने इमारतीमध्ये ये-जा करताना लिफ्ट, तसेच इतरत्र वावर केला असल्याच्या शक्यतेने संपूर्ण इमारतीमधील चाळीस रहिवाशांना क्वारंटाइन केले आहे. आता त्यांचा अहवाल काय येतो. यावरून लोहगावातील रुग्णांचा आकडा ठरणार आहे.
पुण्याच्या इतर बातम्या वाचण्यासाठी येथे- क्लिक करा
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.