Swargate Bus Station : स्वारगेट स्थानकावर आता ‘नजर’ प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’ : पोलिस, एसटी प्रशासनाचे सर्वेक्षण

CCTV Cameras : स्वारगेट बसस्थानकावर ४२ नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत, ज्यामध्ये रात्रीची दृष्टी असलेली सुविधा असणार आहे. पोलिसांसोबत सर्वेक्षण करून प्रवासी सुरक्षेसाठी कॅमेरे योग्य ठिकाणी बसवले जातील.
Swargate Bus Station CCTV Cameras
Swargate Bus Station CCTV Camerassakal
Updated on

पुणे : प्रवाशांच्या सुरक्षेसाठी स्वारगेट बसस्थानकावर नवीन चांगल्या दर्जाचे आणि आधुनिक असे सीसीटीव्ही कॅमेरे बसविले जाणार आहेत. सद्यःस्थितीत १८ कॅमेरे असून, आणखी नवीन ४२ कॅमेरे बसविले जाणार आहे. हे कॅमेरे रात्रीची दृष्टीची (नाईट व्हीजन) सुविधा असलेले असणार आहे. शिवाय नवीन कॅमेरे बसविण्यापूर्वी एसटी प्रशासन स्वारगेट पोलिसांसोबत एकत्रित सर्वेक्षणदेखील करणार आहे. त्यामुळे पोलिसांना तपासाच्या दृष्टीने उपयोगी ठरणाऱ्या जागेची निश्चिती करता येईल. सीसीटीव्हीमुळे प्रवासी सुरक्षा अधिक भक्कम होणार आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.