Dog Bite : अडीच वर्षात ४२ हजार जणांना कुत्र्याचा चावा

पुणे शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत आहे.
Dog Bite
Dog Bitesakal
Updated on

पुणे - शहरामध्ये भटक्या कुत्र्यांची दहशत वाढत आहे. त्याचा फटका महिला, लहान मुले, ज्येष्ठ नागरिकांसह दुचाकीस्वारांना बसत आहे. गेल्या अडीच वर्षात तब्बल ४२ हजार ६६५ हजार जणांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. यामध्ये एकाही नागरिकाचा रेबीज होऊन मृत्यू झालेला नाही, अशी माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे.

शहरातील भटक्या कुत्र्यांच्या संदर्भात आज महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी आढावा बैठक घेतली. अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे, आरोग्य प्रमुख डॉ. भगवान पवार, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सारिका फुंडे यावेळी उपस्थित होत्या.

महापालिकेने २०१८ मध्ये भटक्या कुत्र्यांची गणना केली. त्यामध्ये ३ लाख १५ हजार कुत्र्यांची नोंद झाली होती., तर २०२३ मध्ये केलेल्या गणनेत ही संख्या कमी होऊन १ लाख ७९ हजार ९४० इतकी झाली आहे. महापालिकेने नसबंदी कार्यक्रम व्यवस्थित राबविल्याने कुत्र्यांची वाढ रोखण्यात यश आले आहे असे या अहवालात नमूद केले आहे.

मात्र, शहरातील भटक्या कुत्र्यांचा त्रास कमी झालेला नाही. दिवसा आणि रात्रीच्या वेळी कुत्र्यांचा हल्ला होत असल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. २०२१ पासून या घटनांमध्ये वाद झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे.

दरम्यान, महापालिका आयुक्तांनी शहरातील भटक्या कुत्र्यांचा आढावा घेत नसबंदी करण्याचे काम आणखी वेगात होणे आवश्‍यक आहे. त्यासाठी आणखी दोन संस्थांची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया राबविण्याची सूचना आजच्या बैठकीमध्ये केली आहे.

तसेच जखमी, आजारी कुत्र्यांवर उपचार करण्यासाठीही संस्थांची नियुक्ती केली जाणार आहे. शहरातील पाळीव कुत्र्यांची माहिती एकत्र करुन त्यांना अल्प दरामध्ये लस देण्याची योजना आणणार आहे. त्यामुळे कुत्र्यांपासून होणाऱ्या रेबीज रोगावर नियंत्रण आणणे शक्य होईल.

‘भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्याच्या कामाचा वेग वाढविण्यासाठी आणि आजारी कुत्र्यांवर उपचारासाठी संस्थांची नियुक्ती करण्याच्या सूचना आयुक्तांनी आजच्या आढावा बैठकीमध्ये केल्या आहेत.’

- रवींद्र बिनवडे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका

५२ जणांचा मृत्यू

२०२१ ते ऑगस्ट २०२३ या कालावधीमध्ये पुणे महापालिकेच्या हद्दीत एकाची व्यक्तीचा रेबीजने मृत्यू झालेला नाही. पण महापालिकेच्या हद्दीबाहेर कुत्र्या चावल्याने व पुण्यात उपचारासाठी आलेल्या ५२ जणांचा रेबीजने मृत्यू झाला आहे, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

वर्ष - कुत्र्याने चावा घेण्याच्या घटना

२०२१- १२,०२४

२०२२ - १६,५६९

२०२३ ऑगस्टपर्यंत - १४,०७२

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.