कोरोनाची दुसरी लाट ओसरतेय; पुण्यात दिवसभरात ४५० नवे रुग्ण

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसांतील एकूण मृत्यूमध्ये शहरातील २७ मृत्यू आहेत.
Corona test
Corona testFile photo
Updated on
Summary

जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसांतील एकूण मृत्यूमध्ये शहरातील २७ मृत्यू आहेत.

पुणे : शहरातील कोरोनाची दुसरी लाट पूर्णपणे ओसरली आहे. शहरात सध्या पाच हजार २१३ सक्रिय रुग्ण उरले आहेत. एकूण सक्रिय रुग्णांपैकी फक्त २ हजार २८६ रुग्ण विविध रुग्णालयांत उपचार घेत आहेत. उर्वरित २ हजार ९२७ गृहविलगीकरणात आहेत. शहरातील एकूण सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या एप्रिलअखेरीस ५२ हजारांवर पोचली होती. या ५२ हजारांच्या तुलनेत आता केवळ ४.३९ टक्के रुग्ण शहरात शिल्लक राहिले आहेत. (450 new patients have been found in Pune city on Thursday 3rd June 2021)

पुणे शहरात गुरुवारी (ता. ३) दिवसभरात ४५० नवे रुग्ण सापडले आहेत. याउलट ५१५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. शिवाय पुणे जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात १ हजार ८६४ नवे रुग्ण आढळून आले आहेत. आजच्या एकूण कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात फक्त ३२ नवे रुग्ण आढळून आले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत ५८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसांतील एकूण मृत्यूमध्ये शहरातील २७ मृत्यू आहेत.

Corona test
कमला हॅरिस यांचा थेट मोदींना फोन; लस पुरवठ्यावर झाली चर्चा

दिवसांतील कोरोनामुक्त रुग्णांत शहरातील ५१५ रुग्णांबरोबरच पिंपरी-चिंचवडमधील ८९४, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील १ हजार ३८८, नगरपालिका हद्दीतील १८६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील २२ जणांचा समावेश आहे. आज २३ हजार ६२४ कोरोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत. आजच्या एकूण चाचण्यांपैकी शहरातील ८ हजार १६६ चाचण्या आहेत. पिंपरी चिंचवडमध्ये ६ हजार ३७७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात ७ हजार ३९३, नगरपालिका क्षेत्रात १ हजार ५८९ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रात ९९ जणांची कोरोना चाचणी घेतली आहे.

Corona test
इंग्लंड दौऱ्यावर स्मृतीची झोप भुर्रकन उडून जाते!

चाचण्यांची संख्या ५१ लाखांच्या घरात

दरम्यान, आतापर्यंत पुणे जिल्ह्यात कोरोनाच्या एकूण ५० लाख ८५ हजार ४२० चाचण्या घेतल्या आहेत. एकूण चाचण्यांपैकी एकूण १० लाख १९ हजार २८ कोरोनाबाधित आढळून आले आहेत. या सर्व कोरोनाबाधितांपैकी ९ लाख ७९ हजार ८४० जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य १७ हजार ४२ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. एकूण मृत्यूमध्ये पुणे जिल्ह्याबाहेरील ६८४ मृत्यू आहेत.

पुण्यातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.