पुणे - कोरोनाच्या (Corona) कालावधीत जिल्हा पुरवठा विभागामार्फत जिल्ह्यात ४७ हजार ८५७ मेट्रिक टन गहू (Wheat) आणि तांदूळ (Rice) मोफत वितरित (Free Distribute) करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी उत्तम पाटील यांनी दिली. (48000 Tone Grains Free Distribute in pune Ditrict in Corona Period)
राज्य सरकारने अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांना एक महिन्याकरिता मोफत गहू आणि तांदूळ वितरित करण्यात आला. तसेच, केंद्र सरकारच्या वतीने मे आणि जून महिन्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेंतर्गत प्रतिव्यक्ती तीन किलो गहू आणि दोन किलो तांदूळ मोफत वितरित करण्यात येत आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी तहसिलदारांना प्रत्यक्ष लाभार्थ्यांना तत्काळ धान्य वितरित करण्याबाबत सूचना दिल्या होत्या.
राज्य सरकारच्या वतीने मे महिन्यात जिल्ह्यासाठी १२ हजार २७८ मेट्रिक टन गहू आणि सात हजार ८१६ मेट्रिक टन तांदूळ असे एकूण २० हजार ९५ मेट्रिक टन धान्य वाटप करण्यात आले. राज्य सरकारकडून प्राप्त धान्यसाठ्यापैकी १८ जूनपर्यंत ९७ टक्के धान्य वाटप करण्यात आले आहे.
केंद्र सरकारच्या वतीने मे महिन्यात जिल्ह्यात ११ हजार ६२९ मेट्रिक टन गहू आणि सात हजार ७४७ टन तांदूळ असे एकूण १९ हजार ३७७ मेट्रिक टन धान्य वितरित करण्यात आले आहे. आजअखेर केंद्र सरकारकडून ९७ टक्के धान्य वाटप करण्यात आले. तर, जून महिन्यात जिल्ह्यात पाच हजार २९ टन गहू आणि तीन हजार ३५४ टन तांदूळ असे एकूण आठ हजार ३८४ टन धान्य वाटप करण्यात आले आहे. आजअखेर केंद्र सरकारच्या वतीने जून महिन्यात प्राप्त धान्यसाठ्यापैकी ४२ टक्के धान्य वाटप करण्यात आले आहे. उर्वरित लाभार्थ्यांना या महिनाअखेरपर्यंत पूर्ण धान्य वितरित करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी दिल्या आहेत.
पुणे जिल्ह्यातील धान्य वितरण :
राज्य सरकारमार्फत
मे महिना : २० हजार ९५ मेट्रिक टन
केंद्र सरकारमार्फत
मे महिना : १९ हजार ३७७ मेट्रिक टन
जून महिना आजअखेर : ८ हजार ३८४ टन
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.