Chakan MIDC: चाकणमधील तब्बल 50 कंपन्या राज्याबाहेर? उद्योग संघटनेकडून दुजोरा; सुप्रिया सुळेंकडून सरकारवर हल्लाबोल

Chakan MIDC companies moved: औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रातील ही स्थिती आहे. उद्योग तेंव्हाच थांबतात जेंव्हा तुम्ही त्यांना योग्य त्या पायाभूत सुविधा पुरविता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.
Chakan MIDC supriya sule
Chakan MIDC supriya suleesakal
Updated on

Pune News: चाकण औद्योगिक वसाहतमधील आतापर्यंत ५० कंपन्या गुजरात, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशात स्थलांतरित झाल्या आहेत, असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला आहे. त्यांच्या या दाव्यानंतर राज्यातील वातावरण तापू लागलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी सोशल मीडियावर ट्वीट करत याबाबत चिंता व्यक्त केली आहे.

महाराष्ट्रातील सर्वात चर्चित 'एमआयडीसी'पैकी एक असणाऱ्या चाकण 'एमआयडीसी'तून एक-दोन नाहीतर ५० कंपन्या बाहेर गेल्या आहेत. औद्योगिकदृष्ट्या संपन्न असणाऱ्या महाराष्ट्रातील ही स्थिती आहे. उद्योग तेंव्हाच थांबतात जेंव्हा तुम्ही त्यांना योग्य त्या पायाभूत सुविधा पुरविता, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत.

Chakan MIDC supriya sule
Chakan News : चाकण औद्योगिक वसाहत स्थलांतरित होण्याचा धोका?

गेल्या काही वर्षांतील प्रचंड वाहतूक कोंडी, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे येथे उद्योग सुरु ठेवण्यात उद्योजकांना अडचणी येत आहेत. याबाबत सातत्याने मांडणी करुन देखील राज्य शासनाची भूमिका उदासीन आहे. यामुळेच ही स्थिती उद्भवली असून राज्याच्या हक्काचा रोजगार परराज्यात निघून गेला. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांचे याबाबत काय म्हणणे आहे ? असा सवाल त्यांनी केला आहे.

Chakan MIDC supriya sule
Chakan Encroachment : वीज कंपनीचे गौडबंगाल काही समजेना! चाकणला विजेचे खांब आणि विद्युत रोहित्र ठरत आहेत अतिक्रमणातील डोकेदुखी

जयराम रमशे यांनी केलेल्या दाव्याला चाकणमधील उद्योग संघटनेने देखील दुजोरा दिला आहे. त्यामुळे आता विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये आरोपाचा फेऱ्या झडणार आहेत. चाकण येथे अनेक जागतिक पातळीवरच्या कंपन्या आहेत. पण, याठिकाणी म्हणाव्या तितक्या पायाभूत सुविधा नसल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच ५० कंपन्यांनी स्थलांतर केल्याचं सांगितलं जातं.

मिळालेल्या माहितीनुसार, जुलै महिन्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यासंदर्भात बैठक घेतली होती. यासंदर्भात स्थानिक यंत्रणांना उद्योगांच्या समस्या सोडवण्याचे निर्देश देण्यात आले होते. पण, यावर पुढे काही झाले नाही. केवळ चर्चा होत राहिली. याच काळात काही कंपन्या बाहेरच्या राज्यात स्थलांतर झाल्या आहेत. यासंदर्भात चाकणमधील उद्योगांची सघटना फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने माहिती दिली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.