पुणे : फायनान्स कंपनीच्या मालकाचा मोबाईल हॅक करुन बनावट कागदपत्रांद्वारे त्याच क्रमांकाचे मोबाईल सीमकार्ड मिळवून त्यांच्या बँक खात्यातील तब्बल 50 लाख रुपये काढून घेण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा प्रकार अवघ्या दोन दिवसांमध्ये घडला. याप्रकरणी खडक पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नामांकीत सराफी पेढीची ऑनलाईन फसवणूकीनंतर हॅकींगद्वारे फसवणूक करण्याचा दुसरा मोठा गुन्हा घडला आहे.
याप्रकरणी अजित प्रल्हाद कांबळे (वय 39, रा. लोणी काळभोर) यांनी खडक पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना 26 ते 28 नोव्हेंबर या कालावधीमध्ये टिळक रस्त्यावरील फिनशुअर फायनान्शियल सर्व्हिसेस येथे घडली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कांबळे हे लोणी काळभोर येथे राहायला आहेत. त्यांचे फिनशुअर फायनान्शियल सर्व्हिसेस नावाचे फायनान्सचे कार्यालय आहे.
26 नोव्हेंबरला नेहमीप्रमाणे मुंबईला गेले होते. प्रवासात असताना त्यांचे आयडीया कंपनीचे सीमकार्ड असलेला मोबाईल अचानक बंद पडला. संबंधीत मोबाईल क्रमांक हा ते त्यांच्या फायनान्स कंपनीच्या व्यवहारांसाठी वापरीत होते. प्रवासात असल्याने मोबाईल बंद पडल्यानंतर त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्याच कालावधीत सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या नावाची बनावट कागदपत्रे तयार करुन संबंधीत मोबाईल क्रमांक पुन्हा सुरू केला. त्यानंतर कांबळे यांच्या वेगवेगळ्या बँक खात्यावरील तब्बल 50 लाख रुपये काढून घेतले. ते 28 नोव्हेंबरला अपुण्यात आले. त्याही दिवशी त्यांचा मोबाईल बंद असल्यामुळे ते आयडीया कंपनीच्या कार्यालयात गेले. तेथे त्यांना त्यांचा मोबाईल क्रमांक सुरू असल्याची माहिती मिळाली.
पुणे : शिपायाने मागितली 26 हजारांची लाच; अन् अडकला...
दरम्यान, त्यांनी अधिक चौकशी केली, त्यावेळी त्यांच्या बँक खात्यातील 50 लाख रुपये अनोळखी व्यक्तींनी काढून घेतल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी तत्काळ पोलिसांकडे धाव घेऊन फिर्याद दाखल केली. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) उत्तम चक्रे करीत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.