Pune : नियमित कर्ज फेडकरणाऱ्या शेतकर्यांच्या खात्यावर ५० हजार रुपये जमा

पेढे वाटून सत्कार करण्यात आला
Pune
Pune sakal
Updated on

पारगाव : मेंगडेवाडी ता. आंबेगाव येथील श्री. गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या 158 शेतकर्यांच्या खात्यामध्ये ५० हजार रुपये जमा करण्यात आला तसेच संस्थे तर्फे सर्व सभासदांना 15% लाभांश देण्यात आल्याबद्दल सभासदांनी पेढे वाटून आनंद साजरा केला प्रोत्साहनपर अनुदानाचे पहिले लाभार्थी देवराम कोंडाजी मेंगडे यांना संस्थे तर्फे पेढे भरवुन सत्कार करण्यात आला.

त्यावेळी लाभार्थी शेतकर्याुकडून जल्लोष करण्यात आला याप्रसंगी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष अरुण गिरे, श्री गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष तुकाराम भोर, आनंदराव मेंगडे, दशरथ मेंगडे, जिजाभाऊ गवारी, दिनेश मेंगडे, माजी सरपंच दिलीपराव काशिनाथ रणपिसे, कांताराम गवारी, ज्ञानेश्वर मेंगडे, दिलीप चक्कर, देवराम मेंगडे, सुरेश मेंगडे, शांताराम मेंगडे, अंकुश मेंगडे, रमेश मेंगडे, युवासेना समन्वयक सुनिल गवारी, पोलीस पाटील नितीन मेंगडे, युवा कार्यकर्ते अमोल मेंगडे, गणेश मेंगडे, सुदाम मेंगडे, बबन मेंगडे, तुकाराम दांगट, बंडू अरगडे, सुभाष गवारी उपस्थित होते.

मेंगडेवाडी ता. आंबेगाव: येथील श्री. गणेश विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटी मध्ये महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजने अंतर्गत प्रोत्साहन पर लाभ योजनेंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या 158 शेतकर्यांच्या खात्यामध्ये ५० हजार रुपये जमा झाल्याबद्दल पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.