पुण्यात आज विक्रमी ५० हजार लसीकरण झाले

गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाला गती येत असताना आज (शनिवारी) महापालिका आणि खासगी लसीकरण केंद्रावर विक्रमी ५० हजार २६२ जणांचे लसीकरण झाले.
Vaccination
VaccinationSakal
Updated on

पुणे - गेल्या काही दिवसांपासून लसीकरणाला (Vaccination) गती येत असताना आज (शनिवारी) महापालिका (Municipal) आणि खासगी लसीकरण केंद्रावर विक्रमी ५० हजार २६२ जणांचे लसीकरण झाले आहे. तर एकुण लसीकरण १६ लाखाच्या जवळ गेले आहे. (50000 Vaccination in Pune Today)

महापालिकेला केंद्र सरकारकडून तीन दिवसांपूर्वी ६५ हजार कोव्हीशील्ड लसीचे डोस मिळाले आहेत. त्यामुळे महापालिकेतर्फे १९० ते २०० केंद्रांवर लसीकरणाचे नियोजन केले जात आहे. तसेच १८ ते ४४ या वयोगटाला मोफत लस दिली जात असल्याने लसीकरणाला प्रतिसाद वाढत आहे. खासगी लसीकरण केंद्रावर सशुल्क लसीकरण ही मोठ्याप्रमाणात होत आहे.

Vaccination
पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क माफ; पुणे विद्यापीठाचा निर्णय

यापूर्वी पुणे शहरात महापालिका आणि खासगी केंद्र मिळून ३१ हजार हा एका दिवसातील सर्वाधिक लसीकरणाचा आकडा होता. मात्र, शनिवारी तब्बल ५० हजार २६२ जणांनी लस घेतली आहे. मात्र वयोगटनिहाय आकडेवारी महापालिकेकडून उपलब्ध होऊ शकलेली नाही.

जून महिन्यात सर्वाधिक लसीकरण दिवस

  • २६ जून - ५०२६२

  • २३ जून -३१७३७

  • १९ जून - २९५४५

  • ४ जून - ३०१६४

  • ३ जून - ३०६२४

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.