Crime News : कोणार्क एक्सप्रेस मधून दोन दिवसात ५७ किलो गांजा जप्त

रेल्वे सुरक्षा दलाने सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधून एकूण ५७ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला.
Ganja Seized
Ganja Seizedsakal
Updated on

दौंड - रेल्वे सुरक्षा दलाने सलग दोन दिवस केलेल्या कारवाईत भुवनेश्वर कोणार्क एक्सप्रेस मधून एकूण ५७ किलो २०० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला आहे. बेवारस बॅगांच्या माध्यमातून गांजाची वाहतूक केली जात होती.

दौंड रेल्वे सुरक्षा दलाचे पोलिस निरीक्षक विजय कुमार सोलंकी यांनी या बाबत माहिती दिली. भुवनेश्वर - छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) दरम्यान धावणार्या कोणार्क एक्सप्रेस मधून गांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर १० जुलै रोजी रात्री दौंड रेल्वे स्थानकावर एक्सप्रेसची तपासणी करण्यात आली.

एस - ५ या कोच मध्ये आसन क्रमांक ३९ व ४० च्या खाली दोन बेवारस ट्रॅाली बॅग आढळल्या. कोच मधील प्रवाशांकडे विचारणा केल्यावर सदर ट्रॅाली बॅग बेवारस असल्याची बाब पुढे आली. सदर बॅग उप स्टेशन पर्यवेक्षक यांच्या दालनात नेऊन उघडण्यात आली असता त्यामध्ये एकूण ३३ किलो ८०० ग्रॅम गांजा आढळला.

११ जुलै रोजी रात्री कोणार्क एक्सप्रेसच्या बी - १ या कोच मधील स्वच्छतागृहाजवळ तीन बेवारस सॅक आढळून आल्या. त्यामध्ये एकूण २३ किलो ४०० ग्रॅमगांजा आढळला.

निरीक्षक विजय कुमार सोलंकी यांच्या मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक फेमिदा खान यांच्यासह दिलीप बारवे, प्रदीप गोयकर, नूर शेख, काशिनाथ फुलारी, श्री. केंगले यांनी ही कारवाई केली. सदर गांजा कोणार्क एक्सप्रेस मध्ये कोणी ठेवले व ते कोठे उतरविले जाणार होते , याविषयी पोलिस प्रशासन अनभिज्ञ आहे. सदर गुन्हा व जप्त केलेला गांजा दौंड लोहमार्ग पोलिसांकडे तपासाकरिता वर्ग करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.