पुणे : अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे (अभाविप) ६७ वे राष्ट्रीय अधिवेशन नुकतेच जबलपूर येथे झाले. या अधिवेशनात एकूण ६६५ जणांनी प्रत्यक्ष, तर आभासी पद्धतीने ७० हजारांहून अधिक कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला होता. त्यात बांगलादेशमधील प्रतिनिधींचा समावेश होता. या तीन दिवसीय राष्ट्रीय अधिवेशनात १९६५ च्या युद्धात हुतात्मा झालेले कॅप्टन रमण बक्षी यांच्या नावाने अधिवेशनस्थळी प्रदर्शन कक्षाची उभारणी केली, अशी माहिती अभाविपचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल आणि प्रदेश सहमंत्री अनिल ठोंबरे यांनी पत्रकार परिषदेत दिली.(Akhil Bharatiya Vidyarthi Parishad)
नुकत्याच झालेल्या अधिवेशनाची सांगता म्हणून अभाविपतर्फे मंगळवारी पत्रकार परिषदेचे आयोजन केले होते. त्यावेळी बाचल यांनी अधिवेशनातील झालेल्या चर्चा आणि मांडलेल्या प्रस्तावांची माहिती दिली. अधिवेशनातील घडामोडींबाबत बोलताना बाचल म्हणाले, की या अधिवेशनाचे उद्घाटन व प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्कार वितरण कैलास सत्यार्थी यांच्या उपस्थितीत झाले. दिव्यांगांना सक्षम करण्यासाठी तमिळनाडूच्या कार्तिकेयन गणेशन यांना प्रा. यशवंतराव केळकर युवा पुरस्काराने गौरविण्यात आले. राष्ट्रीय अधिवेशनात शिक्षणाचे पावित्र्य जपण्यासाठी शिक्षण समुदाय पुढे आला पाहिजे, सध्याच्या परिस्थितीत खेळांना प्राधान्य दिले गेले पाहिजे आणि कॅम्पस उपक्रम हे तीन प्रस्तावाचे प्रस्तावही मंजूर करण्यात आले. सुरक्षेसह महाविद्यालये लवकर सुरू करणे, व्हर्च्युअल माध्यमातून शिक्षण घेतल्याने विद्यार्थ्यांच्या बहुआयामी विकासातील अडथळे दूर करणे आदी मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.(Pune News)
बाचल म्हणाले, ‘‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त अभाविप संपूर्ण देशात ज्ञात-अज्ञात हुतात्म्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान करणार आहे. येत्या काळात अभाविप पुणे महानगर १०० महाविद्यालय शाखा व १०० उपनगर समिती घोषित करू. अभाविप संघटनात्मक विस्तारासाठी देशभरात एक हजार ५०० विस्तारक स्थापन करण्याची योजना आखली आहे. संपर्क वाढवण्यासोबतच अभाविपने वर्षभरात एक लाख गावांपर्यंत कामाचा विस्तार करणे, ५० हजार महाविद्यालयांशी संपर्क साधणे आणि एक कोटी सदस्य बनविण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे.’’
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.