जुन्नरच्या आजींची कमाल! वयाच्या ७२ वर्षी 2 दिवसात 2 किल्ले केले सर

72-year-old grandMother kissabai chavan from Junnar Completed Trek of 2 forts in 2 days
72-year-old grandMother kissabai chavan from Junnar Completed Trek of 2 forts in 2 days
Updated on

पिंपळवंडी(पुणे) : वडज (ता.जुन्नर) येथील किसाबाई विठ्ठल चव्हाण या ७२ वर्षीय आजीबाईंनी नवीन वर्षाच्या सुरुवातीला शनिवार (ता.२) व रविवारी (ता.३) अनुक्रमे चावंड व हडसर हे जुन्नर तालुक्यातील दोन किल्ले सर केले. इच्छाशक्ती व आत्मविश्वास असेल तर कोणतीही गोष्ट अवघड नसल्याचे आजींच्या या कृतीतून स्पष्ट झाले. 

किसाबाई  चव्हाण यांनी किल्ले हडसर व चावंड हे गड न थकता  सर करून तरूणां समोर एक आदर्श ठेवला आहे. या मोहिमेत त्यांच्या समवेत त्यांचा मुलगा मल्हारी, सुनबाई कांती मल्हारी चव्हाण तसेच नातवंडे व गाईड साजन भालचिम सहभागी होते. आजीबाईंची यापुढे जुन्नर तालुक्यातील सर्व किल्ले सर करण्याची इच्छा  आहे.

'नॅशनल वॉर मेमोरिअल'चं नूतनीकरण होणार? महापालिका आयुक्तांचा स्थायी समितीकडे प्रस्ताव​

जन्मापासुन शेवटच्या क्षणापर्यंत नुसते कष्ट करणे म्हणजे आयुष्य नाही तर स्वतःच्या समाधानासाठी आनंदाने जगणे म्हणजे खऱ्या अर्थाने आयुष्य जगणे होय. वयाला हरवायचे असेल तर आपले छंद जिवंत ठेवले पाहिजे. समस्या रोज आहेत, निरोगी जीवन व्यतीत करण्यासाठी आपल्या कुटुंबाला सह्याद्रीच्या सानिध्यात घेऊन गेले पाहिजे. हे करत असताना निसर्ग सौंदर्य का जतन केले पाहिजे याचे महत्व त्यांना पटवून द्या व निसर्ग अबाधित ठेवा असे किसाबाईंनी सांगितले.

    हाथरस प्रकरणी योगी सरकारला दणका; हायकोर्टाच्या आदेशानंतर कारवाई​

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.