Pune Crime : वाघोलीतील दोन कापड दुकानदारांना ७४ हजाराचा गंडा

वाघोलीतील दोन कापड दुकानदारांना एका व्यक्तीने खरेदी केल्यानंतर एन ई एफ टी द्वारे पैसे पाठविल्याचे भासवून सुमारे ७४ हजार रुपायांना गंडा घातला. याबाबत कापड दुकानदारांनी लोणीकंद पोलीसांकडे फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिला आहे.
Pune Crime
Pune Crimesakal
Updated on

वाघोली : वाघोलीतील दोन कापड दुकानदारांना एका व्यक्तीने खरेदी केल्यानंतर एन ई एफ टी द्वारे पैसे पाठविल्याचे भासवून सुमारे ७४ हजार रुपायांना गंडा घातला. याबाबत कापड दुकानदारांनी लोणीकंद पोलीसांकडे फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, केसनंद रोड वरील एका कापड दुकानात ही व्यक्ती गेली. त्याने तिथे सुमारे २६ हजार रुपयांची खरेदी केली. पैसे एन ई एफ टी द्वारे पाठवतो असे सांगितले. त्याने तसा मेसेज दाखविला. मी जास्त दहा हजार रुपये पाठविले आहे.

ती रोकड मला द्या अशी मागणी तो करू लागला. मात्र पैसे खात्यात जमा झाल्याशिवाय रोकड देणार नाही. असे दुकानदाराने सांगितले. त्यानंतर तो निघून गेला. त्याने आपले नाव पार्थ चव्हाण असल्याचे सांगत मी मागील सोसायटीत राहत असल्याचेही सांगितले. दुसऱ्या दिवशी पैसे खात्यात जमा झाले नसल्याने दुकानदाराने त्या व्यक्तीला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याने कॉल घेतला नाही.

पुणे नगर महामार्गावर असणाऱ्या कापड दुकानात या व्यक्तीने सुमारे ४० हजार रुपायांची खरेदी केली. तेथेही त्याने एन ई एफ टी द्वारे पैसे देतो असे सांगितले. त्या दुकानदाराने विश्वास ठेवला. जास्त आठ हजार रुपये पाठविले आहे. ती रोकड मला द्या असे त्याने मागणी केली. दुकानदाराने ती रोकड ही त्याला दिली. दुसऱ्या दुकानदाराने या व्यक्तीच्या फसवणुकीबाबत सांगितल्यानंतर त्याने पाठविलेली रोकड जमा झाली की नाही ते तपासले असता रोकड जमा झाली नसल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही पोलीसांना फसवणूक झाल्याचा तक्रार अर्ज दिला. पोलीसांनी सायबर गुन्हा म्हणून केवळ तक्रार अर्ज घेतले आहेत. गुन्हा दाखल केलेला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.