Pune Crime News : फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह मुलावर आणखी एक गुन्हा दाखल

बनावट साक्षीदार तयार करत घेतले ७७ लाखांचे कर्ज
77 lakh fraud news former corporator along with son police case file
77 lakh fraud news former corporator along with son police case fileesakal
Updated on

पुणे : जमीनदारांच्या खोट्या सह्या करीत ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेत दोघांची फसवणूक केल्याप्रकरणी माजी नगरसेवकासह त्याचा मुलगा आणि पतसंस्थेचे दोन पदाधिकारी अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

माजी नगरसेवक उदय त्र्यंबक जोशी (वय ६५) व त्यांचा मुलगा मयुरेश जोशी (वय ४६, दोघे रा. पानमळा), निनाद नागरी पतसंस्थेचे कोषाध्यक्ष रामलिंग शिवगणे आणि सचीव अशोक कुलकर्णी यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत तानाजी दिनकर मोरे (वय ४२, रा. तुकार्इनगर, वडगाव) यांनी विश्रामबाग पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. डिसेंबर २०१९ ते जानेवारी २०२३ दरम्यान हा प्रकार घडला.

गॅस एजन्सीमध्ये पैसे गुंतवल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून अनेकांना कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी जोशी पिता-पुत्रावर यापूर्वीच एक गुन्हा दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयुरेश जोशी याने निनाद नागरी पतसंस्था लिमिटेडमधून घेतलेल्या कर्जप्रकरणाची फिर्यादी यांना कोणतीही माहिती न देता जमीनदार म्हणून त्यांच्या बनावट सह्या घेतल्या.

त्याआधारे उदय जोशी, शिवगणे आणि कुलकर्णी आणि इतर संचालक मंडळातील सदस्यांशी संगनमत करून ७७ लाख रुपयांचे कर्ज मंजूर करून घेतले. त्या कर्जाची परतफेड न करता तसेच कर्जाची माहिती न देता फिर्यादी आणि एका महिलेची फसवणूक केली.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()