77 वर्षांचे 'रायडर' आजोबा; स्कुटीवरुन पालथा घातला देश

vishwas kulkarni
vishwas kulkarni
Updated on
Summary

जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशीच जिद्द मनात ठेवत ७७ वर्षांच्या अवलियाने कोरोनाकाळात केवळ तीन महिन्यांत सुमारे १९ हजार किलोमीटर प्रवास केला.

पुणे- जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही. अशीच जिद्द मनात ठेवत ७७ वर्षांच्या अवलियाने कोरोनाकाळात केवळ तीन महिन्यांत सुमारे १९ हजार किलोमीटर प्रवास केला. विशेष म्हणजे त्यांची हृदयशस्त्रक्रिया झाली आहे. गेल्या २६ वर्षांपासून त्यांना हृदयाचा त्रास आहे. विश्वास कुलकर्णी असे देशाच्या चारही टोकांचे दुचाकीवरूनचा प्रवास करणाऱ्या या अवलियाचे नाव आहे. (77 year old Ryder vishwas kulkarni traveling country on a scooter)

कुलकर्णी हे मूळचे सोलापूरमधील. १९६२ मध्ये ते भारतीय वायुदलात दाखल झाले होते. १५ वर्षे देशसेवा केल्यानंतर ते निवृत्त झाले. त्यानंतर ते पुण्यात आले व टेल्को कंपनीत (आता टाटा मोटर्स) रुजू झाले. टेल्कोमध्ये काही वर्षे नोकरी केल्यानंतर ते निवृत्त झाले. आपल्या भटकंतीचा छंद निवृत्तीनंतर जपायचा, असा निश्चय त्यांनी केला. त्यामुळेच २० वर्षांपेक्षा जास्त आपल्या छंदाला जोपासत शेकडो किलोमीटरचा प्रवास त्यांनी दुचाकीवरून केला आहे.

कुलकर्णी म्हणाले, ‘‘तीन महिन्यांच्या प्रवासाला सुरवात केली तेव्हा लॉकडाउन नव्हता. परंतु प्रवास सुरू झाला, त्यावेळी परिस्थितीशी जुळवत मी हा संपूर्ण प्रवास पार पाडला. अडचण आल्यावर पोलिस प्रशासनासह स्थानिक नागरिकांनी मला मदत केली.’’

vishwas kulkarni
बंगाल भाजपमध्ये खदखद; TMC मधून आलेले नेते ठरताहेत डोकेदुखी

सपत्नीक ८००० किमींचा प्रवास

कुलकर्णी यांच्यासह त्यांची पत्नी नंदा यांनाही प्रवासाची आवड आहे. त्यामुळे त्यांनी कायनेटिक गाडीवरून सपत्नीक आठ हजार किलोमीटरचा प्रवास केला. त्यानंतर त्यांनी राजस्थान, गुजरात, लक्षद्वीप आणि अंदमान असा दुचाकीवरून एकट्याने प्रवास केला.

मुलगा, सुनाची मदत

मोबाईल मॅपच्या माध्यमातून कोठेही जाणे अगदी सहज असताना मला ते हाताळणे जरा कठीण वाटते. त्यामुळे माझा प्रवास योग्य दिशेने होत आहे, याची सर्व खबरदारी माझा मुलगा निलभ आणि सून मृणाल घेतात. ते प्रवासादरम्यान येणाऱ्या गावांची यादी तयार करून मला देता. त्यामुळे प्रवास अधिक सोयीचा आणि सोपा होतो, असे कुलकर्णी यांनी सांगितले.

vishwas kulkarni
मोठी बातमी! काँग्रेसचा बडा नेता करणार भाजप प्रवेश

तीन महिन्यांत केलेला प्रवास :

कर्नाटक, तमिळनाडू, कन्याकुमारी, केरळ, आंध्रप्रदेश, ओरिसा, पश्‍चिम बंगाल यांसह सर्व र्इशान्य भारतातील सर्व राज्यांना त्यांनी भेटी दिल्या. त्यानंतर उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लेह लडाख, पंजाब, राजस्थान, गुजरात आणि पुणे असा प्रवास त्यांनी तीन महिन्यांत पूर्ण केला.

कुलकर्णी यांनी दुचाकीवरून केलेला प्रवास

वर्ष ः ठिकाण

२००८ ः भूतान

२०१२ ः लेह लडाख, पानिपत, कोकण दर्शन आणि ईशान्य भारत

२०१४ ः नेपाळ

२०१५ ः मध्य प्रदेश

२०१९ ः उत्तराखंड

ऊन, पाऊस, कोणतेही दुखणे असो वा कितीही कठीण काळ असो त्यांनी प्रवास सुरू ठेवला. त्यामुळे ते प्रवासाचा हा लांब पल्ला गाठू शकले. आजच्या तरुणार्इने त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायला हवी, असं कुलकर्णी यांचे जावर्इ अतुल ताडफळे सांगतात.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.