Water Storage : पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये ८० टक्के पाणी शिल्लक

पुणे जिल्ह्यातील २६ पैकी नाझरे हे धरण अद्यापही कोरडे ठणठणीत असून उर्वरित २५ धरणांमध्ये मिळून आजअखेर (ता.९) एकूण १५८.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे.
khadakwasla dam water
khadakwasla dam watersakal
Updated on

पुणे - पुणे जिल्ह्यातील २६ पैकी नाझरे हे धरण अद्यापही कोरडे ठणठणीत असून उर्वरित २५ धरणांमध्ये मिळून आजअखेर (ता.९) एकूण १५८.६६ टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ७९.९९ टक्के इतका आहे. गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेपर्यंतच्या शिल्लक पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा मात्र उपलब्ध पाणीसाठा हा ४३.३७ टीएमसीने कमी आहे.

गेल्या वर्षीच्या आजच्या तारखेला जिल्ह्यातील धरणांमध्ये एकूण २०२.०३ पाणीसाठा उपलब्ध होता. गेल्या वर्षीच्या या उपलब्ध पाणीसाठ्याचे प्रमाण हे १०२ टक्के इतके होते. त्यामुळे यंदाचा आजअखेरचा उपलब्ध पाणीसाठा हा गेल्या वर्षीच्या तुलनेत २२.०१ टक्क्यांनी कमी झाला आहे. या २६ धरणांव्यतिरिक्त टाटा समूहाच्या सहा धरणांमधील पाणीसाठा वेगळा आहे. पुणे जिल्ह्यात एकूण ३२ धरणे आहेत. यापैकी सहा धरणे ही टाटा समूहाची आहेत. टाटा समूहाची धरणे वगळता उर्वरित २६ धरणे आहेत.

पुणे जिल्ह्यातील धरणांमध्ये उजनी, भामा आसखेड, माणिकडोह, चासकमान, पवना, मुळशी, टेमघर, वरसगाव, पानशेत, गुंजवणी, नीरा देवधर, भाटघर, वीर आदी प्रमुख धरणांचा समावेश आहे. या सर्व धरणांतील मिळून एकूण प्रकल्पीय उपयुक्त पाणीसाठा क्षमता ही १९८.३४ टीएमसी इतकी आहे.

‘खडकवासला’त १.८८ टीएमसी कमी पाणीसाठा

दरम्यान, पुणे शहराला पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणाऱ्या खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमध्ये मिळून आजअखेरपर्यंत २६.५९ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. या चार धरणांमध्ये टेमघर, वरसगाव, पानशेत आणि खडकवासला यांचा समावेश आहे. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत या चार धरणांमध्ये एकूण २८.४७ टीएमसी पाणीसाठा शिल्लक राहिला होता.

यानुसार गतवर्षीच्या तुलनेत यंदा खडकवासला प्रकल्पातील चार धरणांमधील एकूण पाणीसाठा हा १.८८ टीएमसीने कमी असल्याचे स्पष्ट झाले आहे. जलसंपदा विभागाच्या वतीने प्रसिद्ध करण्यात आलेल्या धरण साठा आकडेवारी अहवालातून हे उघड झाले आहे.

‘उजनी’त ५१ टक्केच पाणी शिल्लक

जिल्ह्यातील उजनी धरणांत सध्या फक्त २७.३१ टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध आहे. या धरणातील उपलब्ध पाणीसाठ्याचे हे प्रमाण एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत ५०.९८ टक्के इतकेच आहे. गेल्या वर्षी याच धरणांतील आजच्या तारखेचा उपलब्ध पाणीसाठा हा ५९.६३ टीएमसी इतका उपलब्ध होता. यानुसार उजनी धरणांत गेल्या वर्षीच्या उपलब्ध पाणीसाठ्याच्या तुलनेत यंदा ३२.३२ टीएमसी कमी पाणीसाठा आहे.

प्रमुख धरणांमधील आजचा साठा (टीएमसीमध्ये)

- टेमघर --- २.६९

- वरसगाव --- १२१३

- पानशेत --- १०.६५

- खडकवासला --- १.१२

- पवना --- ७.८८

- चासकमान --- ७.२८

- भामा आसखेड --- ६.७७

- आंद्रा --- २.७१

- गुंजवणी --- ३.५८

- भाटघर --- २३.३७

- नीरा देवघर --- ११.७१

- वीर --- ५.७८

- माणिकडोह --- ७.९७

- येडगाव --- १.८७

- डिंभे --- १२.०१

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.