पुणे : कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक संसर्ग होण्याच्या धोका तज्ज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून आतापासून या लाटेचा मुकाबला करण्यासाठीची पूर्वतयारी करण्यात आली आहे. यानुसार पुणे व पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील मिळून ८२ रुग्णालयांमधील ८ हजार ७७ बेड (खाटा) हे लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणार आहेत. शिवाय आणखी १५ खासगी रुग्णालये ही पूर्ण क्षमतेने लहान मुलांवरील उपचारासाठी कार्यान्वित करण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
पुणे शहर व जिल्ह्यातील लहान मुलांसाठी राखीव ठेवण्यात येणाऱ्या एकूण खाटांपैकी ७ हजार ९३९ साधे, ४९४ आयसीयू, १८३ व्हेंटिलेटर तर १३८ ऑक्सिजन बेड असणार आहेत. हे बेड प्रामुख्याने समर्पित कोविड आरोग्य केंद्र (डीसीएचसी) आणि समर्पित कोविड हॉस्पिटलमध्ये (डीसीएच) राखीव ठेवण्यात येणार असल्याचे पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी सांगितले.
''सध्या पुणे व पिंपरी चिंचवडमधील कोरोना संसर्ग नियंत्रणात येत असून ग्रामीण भागात मात्र अजूनही रुग्णांची संख्या वाढते आहे. परंतु येत्या काही महिन्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याचा आणि या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा अधिक धोका असल्याचा अंदाज वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविला आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी हा निर्णय घेतला आहे.''
- आयुष प्रसाद, मुख्य कार्यकारी अधिकारी, पुणे जिल्हा परिषद
- क्षेत्र --- रुग्णालये --- साधे बेड --- आयसीयू बेड --- व्हेंटिलेटर बेड
पुणे शहर --- ५३ --- ५९७१ --- २५२ --- ८२
पिंपरी चिंचवड --- ०४ --- १६९१ --- १३८ --- ६६
जिल्हा परिषद कार्यक्षेत्र --- २५ --- २७७ --- १०४ --- ३५
पुणे जिल्हा एकूण --- ८२ --- ७९३९ --- ४९४ --- १८३
१५ खासगी रुग्णालयातही व्यवस्था
याव्यतिरिक्त ग्रामीणमध्ये १३८ ऑक्सिजन बेड
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.