Baramati News : बारामतीच्या मेडिकल कॉलेजची दमदार सलामी! पहिल्या बॅचचे 91 विद्यार्थी झाले डॉक्टरांची

Goverment Medical College Baramati : बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा 91 डॉक्टर्स उत्तीर्ण झाले आहेत.
Goverment Medical College Baramati
Goverment Medical College Baramati
Updated on

बारामती येथील पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून यंदा 91 डॉक्टर्स उत्तीर्ण झाले आहेत. बारामतीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाल्यानंतर डॉक्टरांची पहिली बॅच यंदाच्या वर्षी उत्तीर्ण होऊन बाहेर पडल्यामुळे बारामतीत वैद्यकीय शिक्षण देखील आता परिपूर्ण झाल्याचे हे द्योतक मानले जात आहे.

बारामतीत 2019 मध्ये पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पहिला प्रवेश झाला होता. त्यानंतर पाच वर्षांचा अभ्यासक्रम पूर्ण करून 91 विद्यार्थ्यांनी एम.बी.बी.एस. ही पदवी संपादन केली आहे.

बारामतीत सहापैकी दोन विषयांसाठी आता पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण देखील उपलब्ध होणार आहे अद्ययावत सोयीसुविधा असलेले महाविद्यालय म्हणून बारामतीच्या महाविद्यालयाचा राज्यात नावलौकिक आहे. सुसज्ज ग्रंथालय, ऑडिटोरियम व इतर सर्व सुविधा विद्यार्थ्यांना या ठिकाणी पुरवण्यात आल्या आहेत.या ठिकाणी काही गोष्टी सुरू होण्यास विलंब झाला होता , मात्र आता हे महाविद्यालय नियमितपणे सुरू असून या ठिकाणी उत्तम दर्जाचे शिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे.

Goverment Medical College Baramati
गोफण | लाडका भाऊ योजनेची अधिसूचना

यंदाच्या वर्षी डॉक्टरांची पहिली तुकडी येथून पदवी घेऊन बाहेर पडल्यामुळे बारामतीच्या शैक्षणिक वाटचालीत हा एक मैलाचा दगड ठरणार आहे. इतर सर्व शिक्षणाच्या सोयी सोबतच वैद्यकीय शिक्षणाची सोय देखील बारामतीत उपलब्ध झाल्याने बारामती खऱ्या अर्थाने एज्युकेशन हब म्हणून या पुढील काळात ओळखले जाईल.

Goverment Medical College Baramati
Bhushi Dam Lonavala: पुण्यातील एकाच कुटुंबातील ५ जण भुशी डॅममध्ये गेले वाहून, २ मृतदेह बाहेर काढण्यात यश

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.