पुणे - शहरात सार्वजनिक ठिकाणी कचरा फेकला जातो, असे वारंवार कचरा टाकला जाणाऱ्या ठिकाणांची यादी घनकचरा विभागाने तयार केली आहे. त्यामध्ये ९१३ जागांवर अस्वच्छ (क्रॉनिक स्पॉट) आढळून आल्या आहेत. जनजागृती आणि दंडात्मक कारवाई या दोन्हींच्या माध्यमातून त्यांचे निर्मूलन करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. आत्तापर्यंत केवळ १६१ ठिकाणांवरील कचरा टाकणे बंद झाले आहे.
पुणे महापालिकेला स्वच्छ भारत अभियानात नुकतेच फाइव्ह स्टार रॅकिंग मिळाले आहे. तरीही शहरातील कचरा स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता हे प्रश्न पूर्णपणे संपलेले नाहीत. वाढती हद्द, लोकसंख्या, कचरा संकलनासाठी अपुरी व्यवस्था आणि नागरिकांची मानसिकता यामुळे शहरात रस्त्यावर, मोकळ्या जागा, नाले, नदी या भागात कचरा फेकला जात आहे.
पण शहरात अशा अस्वच्छ ठिकाणांची यादी घनकचरा विभागाकडे नव्हती. घनकचरा विभागाने प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाकडून सर्वेक्षण करून ही यादी तयार केली आहे. पंधरा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ९१३ क्रॉनिक स्पॉट आढळून आले आहेत. या ठिकाणी दैनंदिन स्वच्छता केली जात आहे.
उपनगरांमध्ये संख्या जास्त
क्रॉनिक स्पॉटची संख्या ही वारजे, औंध, हडपसर, नगर रस्ता या महामार्गाच्या लगत असलेल्या भागात जास्त आहे. येते कचरा टाकणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच ज्या ठिकाणचा कचरा उचलला जात आहे, तेथे स्वच्छता करणारे कर्मचारी रांगोळी काढून नागरिकांमध्ये जनजागृती करत आहेत, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली.
क्षेत्रीय कार्यालय आणि क्रॉनिक स्पॉटची संख्या
नगर रस्ता- वडगाव शेरी : १३१
येरवडा-कळस-धानोरी : ३७
ढोले पाटील रस्ता : २४
औंध - बाणेर : ६३
शिवाजीनगर-घोले रस्ता : ४०
कोथरूड-बावधन : ४
धनकवडी-सहकारनगर : ३६
सिंहगड रस्ता ९८
वारजे - कर्वेनगर : ४३
हडपसर-मुंढवा : १५३
कोंढवा-येवलेवाडी : ८७
वानवडी-रामटेकडी : ४९
कसबा-विश्रामबागवाडा : ५९
भवानी पेठ : २१
बिबवेवाडी : ४४
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.