ABVP Protest at SPPU : पुणे विद्यापीठात गोंधळ घातल्याप्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल

ABVP Protest at SPPU : पुणे विद्यापीठात गोंधळ घातल्याप्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Updated on

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत परवानगी नसताना ‘रॅप’ गाण्याच्या झालेल्या चित्रीकरणाबाबत सखोल चौकशी करावी यासाठी तसेच अन्य प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात आंदोलन केले. या दरम्यान विद्यापीठाच्या मुख्य इमारतीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात तोडफोड करण्यात आली.

या तोडफोडप्रकरणी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या १५ ते २० आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. प्रशासनाविरोधात घोषणाबाजी करत आंदोलनकर्ते मुख्य इमारतीत पोचले आणि तेथे दरवाजाच्या काचा फोडण्यात आल्या. त्यामुळे विद्यापीठातील वातावरण चांगलेच तापले. त्यानंतर विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. कारभारी काळे, प्र-कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांच्यासह अधिसभा सदस्य, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांच्यासमोर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्या मांडल्या. त्यांना मागण्यांच्या पूर्ततेचे आश्वासन प्रशासनातर्फे देण्यात आले.

हेही वाचाः Fatty Liver Disease: संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

दरम्यान, विद्यार्थ्यांची जोरदार घोषणाबाजी सुरू होती. विद्यापीठाच्या इमारतीत तोडफोड झाल्याने पोलिस बंदोबस्त मागविण्यात आला. दुपारी उशिरापर्यंत हे आंदोलन सुरू होते.

विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दालनात तोडफोड झाल्याची छायाचित्रे आणि ध्वनिचित्रफीत व्हायरल झाली. परंतु ही तोडफोड अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या आंदोलनादरम्यान कोणत्याही कार्यकर्त्याकडून झालेली नाही. आम्ही विद्यापीठात संविधानिक पद्धतीने आंदोलन केले आहे. विद्यापीठ प्रशासनाला मागण्यांचे निवेदन दिले. मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन विद्यापीठाने दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आल्याचं अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी सांगितलं.

ABVP Protest at SPPU : पुणे विद्यापीठात गोंधळ घातल्याप्रकरणी अभाविपच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल
Flight Urination Case : विमानात पुन्हा मूत्रविसर्जन! एकाने दुसऱ्या प्रवाशावर का केली लघुशंका?

या मागण्यांसाठी आंदोलन

  • विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत परवानगी नसताना ‘रॅप’ गाण्याच्या झालेल्या चित्रीकरणाप्रकरणी कडक कारवाई करावी

  • शैक्षणिक वर्ष २०२२-२३ मधील विद्यार्थ्यांचे पदवी प्रमाणपत्र लवकरात लवकर द्यावे

  • परीक्षांचे प्रलंबित निकाल लावावेत तसेच लागलेल्या निकालांमधील चुका दुरुस्त कराव्यात

  • क्रीडा संकुल विद्यार्थ्यांना वापरण्यासाठी खुले करावे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.