खडकवासला : वरसगाव धरणाच्या भिंतीवर मंगळवारी रात्री दहा वाजण्याच्या सुमारास मगर दिसली आहे. रात्री दहा वाजण्याच्या सुमारास धरणावरील सुरक्षा मंडळाचे कर्मचारी, राहूल जाधव, कुणाल बोराडे पाण्याची पातळी पाहण्यासाठी भिंतीवरून जात होते.
त्यावेळी त्यांना अंधारात समोर हालचाल दिसली. त्यांनी विजेरीच्या उजेडात पाहिले असता त्यांना ती मगर असल्याचे दिसून आले. ती मगर धरणाच्या भिंती लगत असलेल्या सुरक्षा चौकीच्या दिशेने येत होती. त्यांनी मोटारीच्या दिव्यांच्या प्रकाशात तिला पाहिले त्यानंतर तिने दिशा बदलली आणि ती पुढे धरणाच्या भिंतीवरून जाऊ लागली.
तातडीने ही घटना शाखा अभियंता वीरेश राऊत यांना फोनवरून कळविली. तेही मुक्कामी असल्याने ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी तसेच ही घटना वेल्हे वनविभागाला कळवली. वन विभागाचे अधिकारी कर्मचारी व रेस्क्यू टीम रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास घटनास्थळी पोहोचली. ते मगरीच्या हालचालीवर लक्ष ठेवून आहेत.
पाटबंधारे विभागाचे अधिकारी वीरेश राऊत यांनी सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत सातत्याने पाण्याची पातळी पाण्यासाठी येथे जावे लागते. मगर सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या चुकीच्या दिशेनेच येत होते. हे धोकादायक असल्याने मगरीला तिला पकडून पाण्यात टाकावी. असे वनविभागाला सांगितले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.