Pune News : लोहगावात जीमला शॉर्ट सर्किटमुळे लागली आग, कोचिंग क्लासलाही बसली झळ; रविवार होता म्हणून...

लोहगावात स्त्री फिटनेस या जिमला आग लागली. आगीत जिममधिल सर्व साहित्य जळून खाक झाले. रविवारी सायंकाळी आठ वाजता शॉर्ट-सर्किटमुळे ही आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वीस मिनीटांत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली.
Pune News
Pune News sakal
Updated on

लोहगाव : लोहगावात स्त्री फिटनेस या जिमला आग लागली. आगीत जिममधिल सर्व साहित्य जळून खाक झाले. रविवारी सायंकाळी आठ वाजता शॉर्ट-सर्किटमुळे ही आग लागली. आग लागल्याचे समजताच अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. वीस मिनीटांत अग्निशमन दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली. आगीची दाहकता लक्षात घेऊन अग्निशमन दलाच्या आणखी तीन गाड्या घटनास्थळी बोलविण्यात आल्या.

लोहगावातील साठे वस्ती परिसरात ही जिम असून रविवार सुट्टी असल्याने जिममध्ये कोणीही नव्हते. विद्युतदाब कमी-जास्त (व्होल्टेज फ्लक्चुएशन) झाल्यामुळे खालील रबरी मॅटने आग पकडली. तसेच जिममध्ये असणारा स्टेबीलायझर फुटल्याने आग आणखी भडकली. बाजूला लावलेल्या पडद्यांनी आग पकडली आणि इमारतीच्या काचा फुटल्या. अवघ्या काही मिनीटांत आतील सर्व साहित्य जळून खाक झाले.

पाहता-पाहता आग इमारतीच्या वरच्या मजल्यावर पोहचली आणि तिथे असणारा कोचिंग क्लास आगीच्या भक्षस्थानी सापडला. तेथील बेंच आणि खुर्च्यांचे प्रचंड नुकसान झाले. दोन मजली इमारतीमध्ये तळमजल्यावर दुकाने, पहिल्या मजल्यावर जिम, तर दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. उर्वरीत इमारतीचे बांधकाम सुरु असल्याने सुदैवाने तिथे कोणीही उपस्थित नव्हते. अवघ्या वीस मिनीटांत आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले. रविवारी साप्ताहिक सुट्टी असल्याने यात कोणतीही जिवीत हाणी झाली नाही, मात्र लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे जिमचे मालक महेश परांडे यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com