Pune Crime: पुण्यात चार वर्षाच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने केला लैंगिक अत्याचार!

Pune Crime News : रात्री सात वाजता मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.
Pune Crime News
Pune Crimeesakal
Updated on

Pune Latest News: बदलापूरमध्ये चिमुरडीवर अत्याचार झाल्यानंतर महाराष्ट्रात होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांमुळे खळबळ उडाली असताना अशीच एक धक्कादायक घटना घोरपडीमध्ये घडली आहे.

घोरपडी गावातील एका झोपडपट्टी परिसरात राहणाऱ्या चार वर्षाच्या चिमुरडीवर मानलेल्या मामाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली आहे. यासंदर्भात सोमवारी पहाटे एका व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी फरार असून मुंढवा पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Pune Crime News
पुणे जिल्ह्यात पावासाचा धुमाकूळ; कुठे, काय परिस्थिती?

चार वर्षांची चिमुरडी घोरपडीमध्ये तिच्या आई-बाबा व बहिणीसोबत राहते, आरोपीची गेल्या सात -आठ वर्षापासून तिच्या पालकांसोबत ओळख आहे. काही वर्षांपूर्वी तो त्यांच्या शेजारी राहत असे. त्यानंतर घरापासून अर्ध्या किलोमीटर राहायला गेला. परंतु तो नेहमी चिमुरडीच्या घरी येत असे. त्या मुलीला व तिच्या बहिणीला खाऊ देण्यासाठी बाहेर घेऊन जाई.

रविवारी सकाळी आई नसताना घरी आला आणि चिमुरडीला घेऊन गेला. खूप उशीर झाला तरी मुली आली नाही म्हणून चौकशी केल्यावर आरोपी घेऊन गेल्याचे समजले, आईने आरोपीच्या घरी जाऊन पाहिले असता, तिच्या मुलीशी आरोपीने गैरवर्तन केल्याचे समजले.

Pune Crime News
Pune Accident: रात्रीच्या सुमारास पुण्यात रिक्षाचा भीषण अपघात, मायलेकाचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगी जखमी

तिने जागेवरच शिव्या देत कानाखाली मारले आणि चिमुरडीला घरी घेऊन आली. रात्री सात वाजता मुलीच्या पोटात दुखायला लागल्यावर पोलीस स्टेशनला जाऊन याबाबत तक्रार दाखल केली.

मुंढाव्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नीलकंठ जगताप यांनी दिलेल्या माहितीनुसार मुलीची रात्री वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोक्सो कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, आरोपी चाळीस वर्षाचा असून त्याला विविध व्यसन करण्याची सवय आहे, सध्या तो फरार असून शोधकार्य सुरू आहे. मुंढावा पोलिसांच्या दोन टीम त्यावर काम करत आहेत

Pune Crime News
Recession In IT Sector In Pune: IT क्षेत्रात मंदी आल्यास पुण्यावर काय परिणाम होणार?

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.