लोणी काळभोर (पुणे) : पुणे शहर, पिंपरी चिंचवडसह विविध पोलिस ठाण्याच्या हद्दीतून जबरी चोरी, घरफोडी व वाहन चोरी(theif) करणाऱ्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट सहाने हडपसर येथून अटक (man arrest) केली आहे. सदर आरोपीने नऊ पोलिस (police) ठाण्याच्या हद्दीतून ६ लाख ४४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरी केल्याची कबुली दिली आहे. अमरसिंग जगरसिंग टाक (रा. गोसावीवस्ती, बिराजदारनागर, हडपसर, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. (a man arrested for stealing gold jewelery and four-wheeler).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कदमवाकवस्ती (ता. हवेली ) ग्रामपंचायत हद्दीतून एक चारचाकी गाडी अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची तक्रार लोणी काळभोर पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी अवैध धंदे, बेकायदेशीर कृत्य करणारे गुन्हेगार, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरिद्ध गुन्हे करणाऱ्या गुन्हेगार यांच्यावर कठोर कारवाई करण्याचे आदेश पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना देण्यात आले होते.
त्यानुसार गुन्हे शाखेचे पोलिस आयुक्त अशोक मोराळे, पोलिस उपआयुक्त श्रीनिवास घाडगे, गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस आयुक्त लक्ष्मण बोराटे यांच्या मार्गदर्शनाखाली शाखा युनिट सहाचे पोलिस निरीक्षक गणेश माने, ठाणे अंमलदार नितीन मुंढे, मच्छिंद्र वाळके, राहुल माने, हृषीकेश टिळेकर, प्रतीक लाहीगुडे, शेखर काटे नितीन धाडगे, व संजय देशमुख यांचे पथक तयार करण्यात आले होते.
गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेत असताना पोलिस नाईक नितीन मुंढे यांना एका खबऱ्यामार्फत माहिती मिळाली की शिकलकरी गुन्हेगार अमरसिंग टाक हा हडपसर या ठिकाणी आला आहे. त्यानुसार हडपसर या ठिकाणी जाऊन सदर आरोपीस ताब्यात घेण्यात आले. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता आरोपी अमरसिंग टाक याने त्याचा साथीदार जयपालसिंग उर्फ मोन्यासिंग राजपालसिंग टाक यांनी कदमवाकवस्ती येथील फिर्यादीच्या ताब्यातून जबरीने चारचाकी गाडी चोरून नेल्याची कबुली दिली. दरम्यान, आरोपी टाक याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने लोणी काळभोर, हडपसर, लष्कर पोलिस ठाणे, वाणवाडी पोलिस ठाणे, खडकी, कोरेगाव पार्क, पिंपरी, या ठिकाणांवरील पोलिस ठाण्यांच्या हद्दीत नऊ गुन्हे केल्याची कबुली दिली. त्याच्याकडून सोने चांदीचे दागिने, रोख रक्कम व दुचाकी व चारचाकी गाड्या असा एकूण ६ लाख ४४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.