Muharram : पुण्यात मोहरमनिमित्त मिरवणूक उत्साहत

‘ये अलविदा... ये अलविदा... शाहेशही दो अलविदा...’ असे म्हणत पुण्यातील मध्यवर्ती भागांत मुस्लिम बांधवांनी मोहरमनिमित्त बुधवारी (ता. १७) मिरवणूक काढली. पुणे कॅम्प, पर्वती, नानापेठ परिसरात ताबूतांची स्थापना केली होती.
Muharram
Muharram sakal
Updated on

पुणे : ‘ये अलविदा... ये अलविदा... शाहेशही दो अलविदा...’ असे म्हणत पुण्यातील मध्यवर्ती भागांत मुस्लिम बांधवांनी मोहरमनिमित्त बुधवारी (ता. १७) मिरवणूक काढली. पुणे कॅम्प, पर्वती, नानापेठ परिसरात ताबूतांची स्थापना केली होती.

मंगळवारी (ता. १६) रात्री दहा वाजता कॅम्पमधील बन्नू मुकादम ताबूतला पोलिस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली. यावेळी माजी राज्यमंत्री रमेश बागवे, मुश्ताक पटेल, इमाद सय्यद, मंजूर शेख, प्रवीण गाडे, मुनीर सय्यद आदी उपस्थित होते. मिरवणूक मार्गावर नागरिकांनी ताबूत आणि पंजांचे दर्शन घेतले. यावेळी सामाजिक संस्थांनी सरबतचे वाटप केले.

कॅम्पमधील बन्नू मुकादम, यंग भोपळा चौक, अलजमेतूल, बकर कसाब, नेहरू चौकातील सुभानशहा दर्गा, पर्वती दर्शन येथील छबिल पटेल, गुरुवार पेठेतील हर झेंडेवाले यांच्या ताबुतांसह पंजे आणि छबिले मिरवणुकीत सहभागी झाले होते. छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, श्रीदत्त मंदिर चौक, हुतात्मा चौक (बुधवार चौक), बेलबाग चौक, शनिवारवाडा, फुटका बुरूज, गाडगीळ पुतळा चौक, जुना बाजार, डेंगळे पूल, शाहीर अमर शेख चौकमार्गे मिरवणुकीचा संगमपूल येथे समारोप करण्यात आला.

‘यंदा एकादशी आणि मोहरम एकाच दिवशी आले. आपले शहर एकोप्याचे प्रतीक आहे. येथे लोक एकमेकांच्या धर्माचा आणि भावनांचा आदर करतात. येथील वैशिष्ट्ये म्हणजे प्रत्येक सामाजिक कार्यक्रमात प्रत्येक धर्माचे लोक सहभागी होतात.’’

- मुश्ताक पटेल, कार्याध्यक्ष, मुस्लिम औकाफ वेल्फेअर ट्रस्ट

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.