ST Accident News : माळशेज घाटात भरधाव ट्रकने दिली एसटी बसला धडक ; 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी

Accident News
Accident News sakal
Updated on

ST Accident News : माळशेज घाटात एका भरधाव ट्रकने St Bus ला धडक दिल्याने भीषण अपघात झाला आहे. शुक्रवारी कल्याणहुन शिरोळीकडे ही एसटी जात होती. यावेळी हा अपघात झाला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी १५-२० प्रवासी जखमी झाल्याचे वृत्त समोर येत आहे.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी जखमींना उपचारासाठी आळेफाटा,ओतुर, नारायणगाव येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Accident News
Pune Accident : पुण्यातील झेड ब्रिज जवळ मोठा अपघात; एकाचा मृत्यू, ४ जखमी

अधिक माहिती अशी कि,ही बस कल्याणहुन शिरोळीला चालली होती. यावेळी बसमध्ये २० ते २५ प्रवासी होते. खुबी गावाजवळ रात्री ११च्या सुमारास बस पोहोचली. यावेळी समोरीतून येणाऱ्या भरधाव ट्रकने तिला धडक दिली.

या भीषण अपघातात ट्रक रस्त्यावरच उलटला. यावेळी ट्रक चालकासह १५ ते २० जण गंभीर जखमी झाले. सर्वांवर उपचार सुरु आहेत. स्थानिक नागरिकांच्या साहाय्याने प्रशासनाने मदतकार्य केले. यावेळी मोठी वाहतुक कोंडी झाली होती.

Accident News
ST Accident News : माळशेज घाटात भरधाव ट्रकने दिली एसटी बसला धडक ; 15 ते 20 प्रवासी गंभीर जखमी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.