युवकाने जोपासला दुर्मिळ नोटांचा संग्रह करण्याचा छंद

rare notes and coins
rare notes and coinssakal media
Updated on

घोडेगाव : निगडाळे (ता. आंबेगाव) या अतिदुर्गम भागातील युवक करण कुंडलिक कोंढवळे याला वयाच्या अवघ्या 15 व्या वर्षापासून नाणी जमविण्याचा छंद जडला आहे. त्याच्याकडे 15 देशातील परदेशी चलन 33 नोटा व नाणी तसेच भारतातील 66 प्रकारची नाणी व 9 नोंटाचा समावेश आहे. आदिवासी भागातील असे दुर्मिळ उदाहरण पहावयास मिळते.

rare notes and coins
पुणे व पिंपरी-चिंचवडला काय सुरू अन् काय बंद?

हे मुळचे डिंभा धरणातील पुर्नवसन झालेल्या कळंबई या गावातील पुर्नवसनानंतर त्यांनी निगडाळे येथील म्हातारबाची वाडी येथे कायमचे वास्तव्य केले. कुटुंबात वडील कुंडलिक, आई सुभद्रा व बहिण सविता यांनी प्रोत्साहन व मदत केल्याने हा छंद जोपासला गेला असे करण यांनी सांगितले. वडिलांना आयुर्वेदिक औषधांची ओळख असल्याने ते ही औषधे देवून सेवा देण्याचे काम करत असतात. करण म्हणाले, मला लहान पणापासून नाणी व नोटा जमविण्याचा छंद होता. त्यासाठी मी वडीलांनी दिलेले पैसे एका गल्ल्यात जमा करायचो, खर्च करायला कमी साधन असल्या कारणाने मी बरेच पैसे जमा केले होते. असेच काही काळ गेल्यावर आमच्या घऱी संस्थेच्या माध्यमातून अनेक देश विदेशातील संशोधक जंगलाचा अभ्यास करायला येत होते. राहण्याची कोणतीही सुविधा नसल्याने ते आमच्या घरीच मुक्कामाला असायचे. परंतु इंग्रजी भाषेचे ज्ञान मला नसल्यामुळे मी त्याच्याशी बऱ्याचदा Hi - Hello पेक्षा जास्त बोलू शकत नव्हतो. परंतु असेच एकदा आमच्या कडे ऑस्ट्रेलिया या देशांतून हॅरी नावाचा अभ्यासक आमच्या घरी मुक्कामाला आला. त्यावेळेस मी माझी आतापर्यंत जमा केलेली नाणी मोजायला काढली होती. तेव्हा त्यांना ती नाणी पाहून आश्चर्य वाटले मी जमा केलेली नाणी बघू लागले. त्यांची भाषा मला कळत नव्हती परंतु एवढे कळते होते की, मी जमा केलेल्या पैशाची तो वा वा करत होते. थोड्या वेळाने त्यानी मला त्यांच्या कडच्या नोटा दाखविल्या ते बघून मी आश्चर्यचकित झालो. कारण मी भारतीय चलनाच्या व्यतिरिक्त परदेशी चलन या अगोदर कधीच बघितले नव्हते. ते त्याने मला भेट म्हणून दिल्या. ती माझ्या संग्रहातील पहिली विदेशी चलन होते व माझ्या छंदाचा आणि संग्रहाची सुरूवात खऱ्या अर्थाने तेथून झाली.

rare notes and coins
पुणे व पिंपरी-चिंचवडला काय सुरू अन् काय बंद?

दरम्यान, त्या पैशाचे मूल्य कमी होते. परंतु माझ्या दृष्टीने ते अमुल्य होते. ज्याच्यात कंबोडिया या देशाच्या 3 रियाल होते. ज्याच्यात एक हजाराची एक दोन शंभरच्या नोट होते व व्हिएतनाम चे 6 डोंग दिले होते. त्याच्यात वीस हजाराच्या एक, हजाराच्या 2, व दोन हजाराच्या 2 नोटा होत्या. माझ्या दृष्टीने हे पैसे नव्हते तर त्यांचा संग्रह करणे आणि उत्सुकतेने त्याची माहिती जाणून घेण्यात होती. माझ्याकडे येणारे प्रत्येक नाणे मी तपासून बघू लागलो, की हे माझ्या संग्रहात आहेत की नाही व अशा रितीने माझ्या चलनाचा संग्रह कालांतराने वाढू लागला. मला माझा संग्रह इतर लोकांना दाखवण्याचा अभिमान वाटायचा व त्यांना पण एक प्रकारचा वेगळाच आनंद वाटायचा त्यामुळे माझा संग्रह वाढवण्यासाठी ते त्यांच्या जवळील काही जुने नाणे किंवा नोटा मला भेट म्हणून देऊ लागले.

आज माझ्याकडे संग्रह वाढत गेल्याने वेगवेगळ्या देशातील परदेशी चलनातील 33 नोटा व नाणे आहेत. मी परदेशी चलनाबरोबरच आपल्या देशातील, सध्या चलनातील 66 प्रकारची नाणी व जास्त प्रमाण चलनात न येणाऱ्या 9 नोटांचा समावेश आहे. ज्याच्यात बरीच नाणी दुर्मिळ स्वरूपातील आहे. तसेच पुरातन कालीन युगातील चोळ राजवटीतील 1400 वर्षापूर्वीचा 1 नाणे तसेच ब्रिटीश कालीन 1947 चा चांदीचा अर्धा पैसा आहे. तसेच स्वतंत्राच्या सुरवातीच्या काळातील अनेक दुर्मिळ नाण्यांच्या स्वरूपातील 22 नाणी ज्याच्यात 1947 चा आना, 2 पैसे, 5 पैसे, 10 पैसे, 25 पैसे तसेच 1951 मधील पाऊण रूपया यांचा समावेश आहे. तसेच चलनाबाह्य झालेले 500 व 1000 त्या चार नोटा आहेत.

rare notes and coins
पुणे : यवतच्या कांचन व्हेज हॉटेलला भीषण आग

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.