Pune News : कात्रज चौकात एसटी बसच्या चाकाखाली येऊन तरुणीचा मृत्यू

खेड शिवापुर येथील एका कंपनीत ती नोकरीला होती अशी माहिती आहे.
Pune News
Pune Newsesakal
Updated on

कात्रज : दोन दिवसांपूर्वीच कात्रज चौकामध्ये दोन पीएमपी बसमध्ये सापडून कंत्राटी कामगाराचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच कात्रज चौकामध्ये शनिवारी (ता. १५) रात्री नऊच्या सुमारास एसटी बसचा दुचाकीला धक्का लागला व चाकाखाली येऊन एका तरुणीचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

Pune News
Nashik Crime News : पहिली पत्नी असताना दुसरा विवाह करून छळ!

या घटनेची माहिती मिळताच भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे तसेच वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून अधिकचा तपास सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्वेता चंद्रकांत लीमकर (वय २५) मुळ रा. कोल्हापूर असे अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या तरुणीचे नाव आहे. खेड शिवापुर येथील एका कंपनीत ती नोकरीला होती अशी माहिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.