Accident News : विजेच्या लोखंडी खांबाला धडक दिल्याने अपघातात युवकाचा मृत्यू ; मध्यरात्री दोन वाजता कुडजे येथे अपघात

खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लगत असलेल्या कुडजे गावाजवळ दुचाकीने विजेच्या लोखंडी खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी(दि.१८) रोजी मध्यरात्री दोन वाजता झाला आहे.
Accident News
Accident Newssakal
Updated on

खडकवासला : खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रात लगत असलेल्या कुडजे गावाजवळ दुचाकीने विजेच्या लोखंडी खांबाला धडक दिल्याने झालेल्या अपघातात युवकाचा मृत्यू झाला आहे. हा अपघात शुक्रवारी(दि.१८) रोजी मध्यरात्री दोन वाजता झाला आहे. याबाबत उत्तमनगर पोलिस ठाण्यात गुन्हा करण्यात आला आहे.

यशोधन अविनाश देशमुख (वय २३, सध्या रा. मुळगाव- अविरेखा पेट्रोल पंपालगत फुसद रोड, चाळीसगाव जिल्हा जळगाव) याचा या अपघातात मृत्यू झाला आहे. तर त्याच्या सोबत असलेला हर्षल दिपक पाटील (वय २४, रा. मुळगाव- शिक्षक कॉलनी पांचोरा जिल्हा जळगाव) हा जखमी झाला आहे. हे दोघे ही पुण्यातील बावधन येथील पेंबल्स अर्बनीया सोसायटीमध्ये राहत होते. अशी माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसुफ शेख यांनी दिली. याबाबत, उत्तमनगर पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार सचिन प्रभाकर गायकवाड यांनी फिर्याद दिली आहे.

राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीच्या मागे पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या कुडजे गावाच्या हद्दीत ही घटना घडली आहे. यशोधन देशमुख त्याचे यामाहा एफ झेड कंपनीच्या दुचाकी क्रमांक (एमएच १९- डीआर ०३६६) या वरुन व त्याचा मित्र हर्षल पाटीलसह कुडजे येथे फिरावयास आले होते. यावेळी त्याने त्याची दुचाकी हयगईने, अविचाराने, वाहतुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करीत भरधाव वेगात चालवली. त्याचे दुचाकी वरील नियंत्रण सुटले.

कुडजे गावाहून मुख्य रस्त्याने पुढे आगळंबे फाट्याकडे जाताना साहिल हॉटेलच्या अलिकडे १०० मीटर अंतरावर त्याची दुचाकी विजेच्या लोखंडी खांबाला धडकली. या परिसरात तीव्र वळणाजवळ ही घटना घडली आहे. दुचाकीची धडक बसल्याने विजेचा खांब वाकलेला आहे. अशी माहिती उत्तमनगर पोलिसांनी दिली आहे.

यामध्ये अपघातामध्ये यशोधनच्या डोक्याला जबर मार लागल्याने मृत्यू झाला आहे. तसेच त्याचे दुचाकी धडकुन तीचे समोरील बाजूने चेंबली आहे. दुचाकीचे हेडलाईट, इंडिकेटर इत्यादी तुटुन नुकसान झाले आहे. त्याचे मित्र हर्षल पाटील हा गंभीर जखमी झाला आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर, यशोधनच्या मृतदेहावर ससून रुगणालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर, त्याचा मृतदेह त्याच्या नातेवाईकाच्या ताब्यात दिला. ते मृतदेह घेऊन चाळीसगावला गेले. तेथे त्याच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.

उत्तमनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक युसुफ शेख, पोलिस निरीक्षक गुन्हे विभाग जितेंद्र कदम, फौजदार मुकेश कुरेवडा, सहायक फौजदार प्रसाद जोशी यांनी घटनास्थळाची पाहणी केली.

कायद्याचे शिक्षण घेणाऱ्या युवकाचा मृत्यू

या अपघातात यशोधन अविनाश देशमुख या २३ वर्षाचा युवकाचा मृत्यू झाल्या आहे. तो पुण्यात भारती विद्यापीठाच्या कोथरूड येथील न्यू लॉ कॉलेजमध्ये कायद्याचे शिक्षण घेत होता. तो मुळचा चाळीसगाव आहे. येथील राष्ट्रीय सहकारी शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अविनाश (नानासाहेब) फकीरराव देशमुख यांचा तो मुलगा होता. त्याचा मोठा भाऊ व बहीण दोघे ही डॉक्टर आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()