PM मोदींविरोधात अर्वाच्च भाषेत बोलणं भोवलं! सचिन बनसोडे यांच्यासह 150 अज्ञातांविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या दरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपने केला होता
pm modi
pm modi sakal
Updated on

पंतप्रधान नरेंद्र मोदी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्याविषयी अर्वाच्य भाषेत घोषणाबाजी केल्याप्रकरणी भारतमुक्ती मोर्चाच्या अध्यक्षासह १५० जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पुणे दौऱ्याच्या दरम्यान शिवीगाळ केल्याचा आरोप भाजपने केला होता.

याप्रकरणी भारतमुक्ती मोर्चाचे अध्यक्ष सचिन बनसोडे, रोहित मल्लाप्पा उर्फ मल्लू शिंगे यांच्यासह १५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय जनता पक्षाचे युवा मोर्चाचे कसबा विधानसभेचे अध्यक्ष अमित कंक यांनी फरासखाना पोलीस ठाण्यात याबाबत फिर्याद दिली आहे.

pm modi
Sujay Vikhe-Patil: राजकारणातील कटुता मिटली? रोहित पवारांच्या बॅनरवर झळकले सुजय विखे! एकत्र आल्याचे कारणही स्पष्ट

पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये 150 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कलम 143 ,149 अंतर्गत फरासखाना पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिव्या देतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

शिव्या देणारे लोक बामसेफ संघटनेचे असल्याचा आरोप करत भाजपने तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीच्या आधारे पुण्यातील फरासखाना पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

pm modi
Canada: खलिस्तानी समर्थकांनी कॅनडातील आणखी एका हिंदू मंदिराची केली तोडफोड अन्...; घटना CCTVमध्ये कैद

भारतमुक्ती मोर्चाकडून शिवाजी रस्त्यावरुन फेरी काढण्यात आली होती. फेरीत सहभागी झालेले बनसोडे, शिंगे यांच्यासह १०० ते १५० कार्यकर्त्यांनी पंतप्रधान मोदी, तसेच सरसंघचालक भागवत यांच्याविषयी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. या घटनेचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला होता. पोलीस निरीक्षक अनिता हिवरकर तपास करत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.