पुणे - ‘अपघातानंतर पोलिसांनी वाहनचालकाला अटक केली. परंतु त्याला लगेच दुसऱ्या दिवशी जामीन मिळाल्याने आम्हाला धक्काच बसला. आम्हाला यंत्रणेकडून न्याय मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु आम्हाला सर्व निराशाच दिसत आहे. चालकाकडून किमान क्षमायाचना होईल किंवा मानवतेच्या भावनेतून कोणी आमचे सांत्वन करेल अशी अपेक्षा होती.