Accident News: मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एकाच दिवशी दोन भीषण अपघात; २ जणांचा मृत्यू, ११ जण जखमी

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे.
Accident News
Accident NewsEsakal
Updated on

गेल्या काही दिवसांमध्ये अपघातांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे वर एकाच दिवशी झालेल्या दोन अपघातांमध्ये 2 जणांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत. काल (शनिवारी) रात्री 12 आणि पहाटे 3 च्या दरम्यान झालेल्या दोन वेगवेगळ्या अपघातात दोन चालकांचा मृत्यू झाला आहे. तर ११ जण जखमी झाले आहेत.

मुंबई पुणे एक्स्प्रेस वे वर काल (शनिवारी) रात्री दुधाच्या टँकरची एका गाडीला जोरदार धडक बसली. या अपघातामध्ये टँकर चालकाचा जागीत मृत्यू झाला. रात्री बारा वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक रहिवाशांच्या मदतीने क्रेनच्या सहाय्याने ट्रकची केबीन तोडून चालकाला बाहेर काढण्यात आले.या अपघातानंतर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.

Accident News
Accident News: अहमदनगरमध्ये भीषण अपघात; उसाने भरलेला ट्रक उलटला, ट्रकखाली चिरडून महिलेचा मृत्यू

त्यानंतर आज पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर एका खाजगी बसला अपघात झाला आहे. मुंबई ते कोल्हापूर जाणारी ही खाजगी बस होती. या अपघातात बस चालकाचा मृत्यू झाला आहे, तर 11 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींना खोपोली आणि पनवेल येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज पहाटे 3 वाजता ही घटना घडली आहे.

Accident News
Nandurbar Accident News : बसच्या धडकेत महिलेचा मृत्यू

घटनेची माहिती मिळताच स्थानिक आणि पोलिसांच्या मदतीने जखमींना तातडीने उपचारासाठी रवाना करण्यात आले आहे. बसमध्ये एकूण 15 ते 20 प्रवासी असल्याची माहिती आहे. काहींना दुसऱ्या बसमधून पुढे पाठवण्यात आले. दरम्यान, या अपघातामुळे काही काळ वाहतूक कोंडी मिर्माण झाली होती.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()