Accident News : पुणे-सातारा महामार्गावर दोन कंटेनर ,दोन बसचा अपघात; दोन ठार, आठ जखमी

अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून मृतात एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश
Accident News : पुणे-सातारा महामार्गावर दोन कंटेनर ,दोन बसचा अपघात; दोन ठार, आठ जखमी
Updated on

नसरापूर : पुणे सातारा महामार्गावर वरवे ता. गावच्या हद्दीत दोन कंटेनर व एक शिवशाही व आराम बस यांच्या झालेल्या विचित्र अपघातात दोन जण जागीच ठार झाले असून मृतात एका नऊ वर्षीय मुलीचा समावेश आहे.

ऋतुजा रवींद्र चव्हाण वय ९ रा. खडकमाळ, उत्तमनगर व खाजगी बसचा चालक शिवराज कुमार एच आर रा. होसैहळ्ळी कर्नाटक या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला असुन सुनंदा रवींद्र चव्हाण वय ४२ खडकमाळ, उत्तमनगर,

रत्ना रवींद्र पुजारी वय ३८, रवींद्र रामा पुजारी वय ४१ ( दोघेही रा. ठाणे मुंबई ), विना प्रभाकर गौडा वय ३४, ज्योती जयराम गौडा वय ३९,पर्वतमा देवे गौडा वय ४२, हेमा अण्णा गौडा वय ३५ सर्व रा. मुंबई मिनाक्षी मायशेट्टी गौडा वय ३५,संजु रवी गौडा,वय २४,प्रदीप नज्जाप्पा गौडा वय २५ अशी जखमीचे नावे असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.

पुणे सातारा महामार्गावर वरवे ता. भोर येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याचा सुमारास घडली आहे. कर्नाटक येथुन आलेली खाजगी श्रीकृष्ण ट्रॅव्हल ची बस क्र. के ऐ ५१ ए एफ ५७०७ पुणे बाजूकडे जात असताना प्रवाशांना नाष्टासाठी लक्झरी बसने सेवा रस्त्यावर डाव्या बाजूस युटर्न मारत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने एम एच ४६ ऐ के ६३०९ जोरदार धडक दिल्याने लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली.

यात लक्झरी चालक शिवराज कुमार जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. व पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनर क्र. एम एच ०४ एच वाय ०२७९ ला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बस क्र. एम एच ०९ ई एम १३८० ला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी क्रुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली.

अपघात होताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीसांनी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.

Accident News : पुणे-सातारा महामार्गावर दोन कंटेनर ,दोन बसचा अपघात; दोन ठार, आठ जखमी
Satara Accident News : पुणे-सातारा महामार्गावर ४ वाहनांचा भीषण अपघात! चौघांचा मृत्यू, २३ जण गंभीर जखमी

अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

प्रभाकर गौडा वय ३४, ज्योती जयराम गौडा वय ३९,पर्वतमा देवे गौडा वय ४२, हेमा अण्णा गौडा वय ३५ सर्व रा. मुंबई मिनाक्षी मायशेट्टी गौडा वय ३५,संजु रवी गौडा,वय २४,प्रदीप नज्जाप्पा गौडा वय २५ अशी जखमीचे नावे असून दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. पुणे सातारा महामार्गावर वरवे ता. भोर येथे रविवारी सकाळी आठ वाजण्याचा सुमारास घडली आहे.

Accident News : पुणे-सातारा महामार्गावर दोन कंटेनर ,दोन बसचा अपघात; दोन ठार, आठ जखमी
Accident : वारीच्या पहिल्याच दिवशी एसटीचा भीषण अपघात; वारकरी जखमी

कर्नाटक येथुन आलेली खाजगी श्रीकृष्ण ट्रॅव्हल ची बस क्र. के ऐ ५१ ए एफ ५७०७ पुणे बाजूकडे जात असताना प्रवाशांना नाष्टासाठी लक्झरी बसने सेवा रस्त्यावर डाव्या बाजूस युटर्न मारत असताना पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या कंटेनरने एम एच ४६ ऐ के ६३०९ जोरदार धडक दिल्याने लक्झरी बस महामार्गावर जागीच पलटी झाली.

यात लक्झरी चालक शिवराज कुमार जागीच ठार झाला. तर धडक दिलेला कंटेनर हा सातारा बाजूकडे जाणाऱ्या दिशेने महामार्गावर घुसला. व पुणे बाजूकडून येणाऱ्या कंटेनर क्र. एम एच ०४ एच वाय ०२७९ ला धडकला व तो कंटेनर शेजारून जाणाऱ्या शिवशाही बस क्र. एम एच ०९ ई एम १३८० ला धडकला. व शिवशाही बस मधील नऊ वयाची मुलगी क्रुतुजा गंभीर जखमी होऊन मृत्यू पावली.

Accident News : पुणे-सातारा महामार्गावर दोन कंटेनर ,दोन बसचा अपघात; दोन ठार, आठ जखमी
Odisha Railway Accident: मोठी अपडेट; CBI ने बहनगा स्टेशन केले सील

अपघात होताच राजगड पोलीस, महामार्ग पोलीसांनी धाव घेतली. तीन क्रेन च्या साह्याने अपघातातील वाहने बाजूला करून जखमींना पाच रुग्णवाहिका मधुन जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघाताने वाहतूक कोंडी झाली होती तब्बल तीन तासांनी वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी महामार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या लांब रांगा लागल्या होत्या. जखमीवर नसरापूर, शिवापूर व कापुरव्होळ येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.