Pune News : मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने सिंहगड रस्त्यावर अपघात

सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी गेटच्या जवळ मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे.
accident on sinhagad road due to drunk driver losing control police hospital
accident on sinhagad road due to drunk driver losing control police hospitalSakal
Updated on

वडगाव : सिंहगड रस्त्यावरील नांदेड फाटा ते किरकटवाडी या दरम्यान असलेल्या राष्ट्रीय जल अकादमी गेटच्या जवळ मद्यधुंद कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात झाला आहे. दुभाजक तोडून कार थेट विरुद्ध दिशेला येऊन आदळली आहे.

सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नसून खडकवासला बाजूकडे जात असलेले दुचाकीवरील काही नागरिक थोडक्यात बचावले आहेत. कारचा वेग खूप जास्त असल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.

नऊ ते सव्वानऊ वाजण्याच्या सुमारास खडकवासला बाजूकडून मद्यधुंद तरुण कारने पुण्याच्या दिशेने जात होते. एनडब्ल्युए गेट जवळ चालकाचे नियंत्रण सुटले व कार दुभाजकावर आदळून थेट विरुद्ध बाजूला गेली.

त्याच वेळी दुसऱ्या बाजूने जात असलेले दुचाकीवरील काही नागरिक थोडक्यात बचावले. दुचाकीवरील एकाच्या पायाला किरकोळ दुखापत झाली आहे. अपघातात जीवितहानी झालेली नसून कारचे मात्र मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

अपघातानंतर कारमधील तरुणांना नीट उभेही राहता येत नव्हते. धुलवड असल्याने सकाळी काही वेळ हवेली पोलीसांनी खडकवासला धरण चौकात नाकाबंदी करुन ‘दाखवण्यापुरती’ वाहनतपासणी केली मात्र नाकाबंदीची खरी गरज सायंकाळी होती.

मद्यधुंद कारचालक, दुचाकीस्वार यांना खडकवासला धरण चौकात अडवून योग्य कारवाई केली असती तर अपघात टाळता आला असता. हवेली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन वांगडे यांच्याशी संपर्क करुन याबाबत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला परंतु त्यांनी फोनला उत्तर दिले नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.