Manchar Accident : ट्रॅव्हल बसने दिलेल्या धडकेत मोटारसायकलवरील तीन तरुण मित्रांचा मृत्यू

जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर शेवाळवाडी (ता.आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या हद्दीत ट्रॅव्हल बसने मोटारसायकलवरील तीन मित्रांना धडक दिली.
Accident
Accidentsakal
Updated on

मंचर - जुन्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर मंचरच्या दक्षिणेला दोन किलोमीटर अंतरावर शेवाळवाडी (ता. आंबेगाव) ग्रामपंचायतीच्या हद्दीत श्रावणी हॉटेलच्याजवळ ट्रॅव्हल बसने धडक दिली. झालेल्या भीषण अपघातात मोटारसायकलवरील तीन तरुण मित्रांचा मृत्यू झाला आहे. प्रतीक तुकाराम गारे (वय-२१, रा. हिवरे, ता. जुन्नर), तेजस मारुती घोडे (वय-२१, रा. बोरघर, ता. आंबेगाव) व करण ज्ञानेश्वर ढेंगले (वय-१८, रा. ढेंगळेवाडी, ता. जुन्नर) अशी मृत्यूमुखी पडलेल्या तरुणांची नावे आहेत. शनिवारी (ता. ७) पहाटे दीड वाजता अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.