Pune News : खचलेल्या चेंबरमुळे अपघात; भाजपचे प्रशानसाविरोधात आंदोलन

महापालिकेने गेल्याच महिन्यात प्रभाग रस्त्यावर डांबरीकरण केले.
Accidents due to chambers BJPs agitation against administration pmc pune
Accidents due to chambers BJPs agitation against administration pmc punesakal
Updated on

पुणे : प्रभात रस्त्यावर डांबरीकरण करून एक महिना झालेला असताना रस्त्यावरील मलःवाहिनीचे चेंबर खचल्याने आज दुपारी दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाला. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रशासनाविरोधात आंदोलन केले.

पुणे महापालिकेतर्फे शहरात रस्ते डांबरीकरणाची कामे करताना ड्रेनेज, पावसाळी गटारांची चेंबर रस्त्याच्या समपातळीमध्ये नसल्याने मोठा खड्डा रस्त्यात तयार झालेले आहेत. या खड्ड्यात गाड्या आदळून अपघात होत आहेत. तसेच चेंबर चुकविताना वाहनचालकांची तारांबळ उडत आहे.

Accidents due to chambers BJPs agitation against administration pmc pune
PMC Recruitment : पुणे महापालिकेत भरतीसाठी परीक्षा; जून, जुलैमध्ये प्रक्रिया; ३२० जागांसाठी १० हजार अर्ज

महापालिकेने गेल्याच महिन्यात प्रभाग रस्त्यावर डांबरीकरण केले. त्यापूर्वी या रस्त्यावर मलःविसारन वाहिनी टाकण्यात आलेली आहे. गेल्या काही दिवसांपासून चेंबरचे झाकण खचल्याने त्याविरोधात पथ विभागाकडे तक्रार करण्यात आलेली होती. पण त्याकडे प्रशासनाने लक्ष दिले आहे. आज दुपारी प्रभात रस्त्यावर हॉटेल लक्ष्मण समोर चेंबरमध्ये आदळून दुचाकीस्वार महिलेचा अपघात झाला.

Accidents due to chambers BJPs agitation against administration pmc pune
Pune Crime : महिलेचे शोषण आणि सैन्यात भरतीचे आमिष; तोतया लष्करी अधिकाऱ्याला अटक

त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. सुनील पांडे यांनी महापालिका चेंबर दुरुस्त नाही तो पर्यंत उपोषण करण्याचा इशारा दिला. अखेर प्रशासनाने याची दखल घेत सायंकाळी चेंबर दुरुस्तीचे काम सुरू केले.

Accidents due to chambers BJPs agitation against administration pmc pune
Pune University : टाईम्स रॅंकिंगमध्ये पुणे विद्यापीठ आशियामध्ये पहिल्या दोनशेत!

मंगळवार पर्यंत सर्व चेंबर दुरुस्त झाले नाहीत तर अधिकाऱ्यांच्या कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा पांडे यांनी दिला. कार्यकारी अभियंता दिनकर गोजारे म्हणाले, ‘‘चेंबरच्या झाकनाखालील विटाचे काम समपातळीमध्ये नसल्याने चेंबरचे झाकण हलले असावे. चेंबर दुरुस्त करण्यासाठीचे काम सुरू झाले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()