चाकण : न्यायालयातून जामीनावर सुटलेले अनेक आरोपी चाकण पोलीस ठाण्यात ठरलेल्या कालावधीत हजेरी देत नाहीत ते मोकाट झाले आहेत. काहीजण स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी सोशल मीडियावरून त्यांचा गवगवा करत आहेत. काही आरोपी जामिनावर सुटल्यानंतर समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत व गैरप्रकार करत आहेत. या आरोपींना धडा बसण्यासाठी पोलिसांनी त्यांची हजेरी सुरळीत करावी अशी मागणी नागरिकांची आहे.
चाकण,ता. खेड येथील पोलीस ठाण्यात न्यायालयातून जमिनावर सुटलेले सुमारे 53आरोपी आहेत. त्यातील अठरा लोक हजेरी देत नाहीत.बाकीचे लोक हजेरी देत आहेत.काहींची आठवड्यातून एकदा तर काहींची महिन्यातून एकदा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या हजेरी आहेत. आरोपीना हजेरी देणे न्यायालयाने बंधनकारक केलेले असतानाही काही आरोपी सराईतपणे समाजात वागत आहेत. हजेरी देत नाहीत हा धक्कादायक प्रकार आहे.
न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर काहीजण मी त्यातला नाही, गुन्हेगार नाही असा लोकांचा समज करून समाजात उजळ माथ्याने फिरत आहेत काही गैरप्रकार करत आहे. सोशल मीडियावर ते ऍक्टिव्ह असून त्यामुळे नागरिकांना काही घटकांना त्याचा त्रास होत आहे. कायदा सुव्यवस्थेचा प्रश्नही निर्माण होत आहे.
या आरोपीना जेरबंद करावे अशी मागणी नागरिकांची आहे. याबाबत चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, जे आरोपी न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर हजेरी देत नाहीत. त्यांचा जामीन रद्द करण्याबाबतचे पत्र न्यायालयाला देण्यात येणार आहे. ठरवून दिलेली हजेरी आरोपींनी पोलीस ठाण्यात देणे बंधनकारक आहे. आरोपी न्यायालयातून जामीनावर सुटल्यानंतर गैरप्रकार करत असतील त्यांना चाप दिला जाईल. त्यांना बाहेर जाण्यास प्रतिबंध आहे.
गुन्हा केलेल्या अनेक आरोपीना हजेरी बंधनकारक आहे.परंतु काही गुन्हेगार मी अमुक आहे मी तमुक आहे या नावाखाली हजेरी देत नाहीत.त्यांचा जामीन रद्द केला जाईल. गुन्हेगार जामीनावर सुटल्यानंतर स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी जाहिरात बाजी करतात फ्लेक्स लावतात अशा आरोपींचा शोध घेतला जाईल व त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.