बारामतीतील वडगावच्या पोलिसांवर फलटणमध्ये आरोपींकडून गोळीबार

Crime-Scene
Crime-Scene
Updated on

बारामती - कापूरहोळ येथील ज्वेलर्सवर दरोडा टाकून गोळीबार करणारे तसेच बारामती तालुक्यात मोरगावच्या व्यापा-यास लुटणा-या  दोन आरोपींनी आज वडगाव निंबाळकर पोलिसांवर गोळीबार केला. सातारा जिल्ह्यातील फलटण नजिक वडणे गावाच्या हद्दीत हा प्रकार झाल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक मिलिंद मोहिते यांनी दिली. अप्पा माने व सुहास सोनवलकर अशी या दोन संशयित आरोपीची नावे आहेत.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 राजगड पोलिस ठाण्याच् हद्दीत या प्रकरणातील आरोपींनी दुचाकीवरुन पळ काढण्याचा प्रयत्न केला, तेव्हा वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरिक्षक सोमनाथ लांडे, फौजदार ननवरे व इतर पोलिसांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील छ-याच्या पिस्तूलातून पोलिसांवर गोळीबार केला. या गोळीबाराच्या गडबडीत ते उसाच्या शेतात पळून जाण्यात यशस्वी ठरले आहेत. आरोपी हे वडले या गावचेच असल्याचेही मोहिते यांनी नमूद केले. 

कापूरहोळच्या चौकात बालाजी ज्वेलर्स हे दुकान लुटतानाही या दोघांनी तीन फैरी झाडल्याचेही मोहिते यांनी सांगितले. या घटनेनंतर फलटण पोलिसांची मदत मागविण्यात आली असून या दोघांचा शोध पोलिसांनी युध्दपातळीवर सुरु केला आहे. 

हे दोन्ही आरोपी सराईत असून त्यांच्याकडे शस्त्र असल्याची पोलिसांना माहिती असल्याने वडगाव निंबाळकर पोलिसही शस्त्रांसह त्यांना पकडण्यासाठी गेले होते, त्यांच्या दुचाकीला धडक देऊन त्यांना थांबविण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला, पण त्याच वेळेस त्यांनी आपल्याकडील छ-याच्या पिस्तुलातून पोलिसांवरच गोळीबार केला, सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नाही, मात्र या घटनेनंतर वरिष्ठ पातळीवरुन तातडीने फलटण पोलिसांची कुमक वडगाव निंबाळकर पोलिसांच्या मदतीला धावून आली आहे. दरम्यान अद्यापही त्यांचे शोधकार्य सुरु असून आरोपी मिळाले नसल्याचे मिलिंद मोहिते यांनी सांगितले.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()