Sharad Mohol: गुंड शरद मोहोळला गोळ्या घालून मारणारा कोण? एका हल्लेखोराची पटली ओळख

शरद मोहोळला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि ससून हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मोहोळ याला मृत घोषित करण्यात आले.
Sharad Mohol Attacked
Sharad Mohol Attacked
Updated on

Sharad Mohol Attacked: कुख्यात गुंड शरद मोहोळ याच्यावर हल्ला करणाऱ्या ३ आरोपींपैकी एका आरोपीचे नाव निष्पन्न झाले आहे. साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर असे आरोपीचे नाव आहे. पोळेकर याने त्याच्या इतर साथीदारांसह शरद मोहोळ याच्यावर आज पुण्यातील कोथरूड भागात गोळीबार केला.

शरद मोहोळला उपचारासाठी सह्याद्री हॉस्पिटल कोथरूड आणि ससून हॉस्पिटल इथे दाखल करण्यात आले असता उपचारादरम्यान मोहोळ याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान गुन्ह्यात निष्पन्न झालेल्या आरोपींचा शोध पोलीस घेत आहे. 

आज दुपारी 1.30 च्या सुमारास कोथरूडमधील सुतारदरा येथे तीन ते चार अज्ञात हल्लेखोरांनी मोहोळ याच्यावर गोळीबार केला. दरम्यान हल्लेखोरांना पकडण्यासाठी पथके तयार करण्यात आली आहेत. मोहोळवर खून, दरोड्यासह अनेक गुन्हे दाखल आहेत.

Sharad Mohol Attacked
Sharad Mohol Attacked : कोथरुडमध्ये 'मुळशी पॅटर्न', गुंड शरद मोहोळवर गोळीबार, कोणी केला हल्ला?

शरद मोहोळ हा पुण्याचा कुख्यात गुन्हेगार आहे. त्याच्यावर खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, अपहरण असे गुन्हे दाखल आहेत. पिंटू मारणे यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी त्याला अटक करण्यात आली होती. या प्रकरणात तो जामिनावर होता. जुलै 2022 मध्ये शरद मोहोळ याला पुणे जिल्ह्यातून सहा महिन्यांसाठी तडीपार देखील करण्यात आले होते. (Pune Crime News)

Sharad Mohol Attacked
Who Is Sharad Mohol: मारणे-मोहोळ गँगवॉर अन् शरदचा गुन्हेगारी विश्वात प्रवेश! भावाचा बदला 'असा' ठरला टर्निंग पॉईंट

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.