कोथरुड/ पुणे : रात्री पावणेदहाच्या सुमारास बेलापूर मुंबईकडून बारामतीकडे जाणाऱ्या टँकरमधून अॅसिटीक अॅसीडची गळती सुरु झाली. त्याचा हवेशी संपर्क आल्याने भुसारी कॉलनी, वेदभवन, बावधनचा काही भाग येथे राहणाऱ्या लोकांना उग्रवास, डोळ्यांची चुरचुर होणे याचा त्रास होवू लागला. अॅसिटीक अॅसीड हवेत मिसळल्याने तयार होणाऱ्या विषारी वायुमुळे फुफ्फुसे, नाक व श्वसन क्रियेशी पुरक अवयवांबरोबरच डोळ्यांना देखील हानी पोहचली असती. सुदैवाने अग्निशमन दलाचे जवान लगेच आल्याने दुर्घटना टळली.
ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
श्रृती मशिन ट्रान्सपोर्ट बेलापूर मुंबई यांचा हा अठरा चाकी टँकर असून तो अॅसिटीक अॅसिडचा कच्चा माल ज्युनिलंड लाईफ सायन्स प्रा. लि. कंपनी निरा बारामती येथे चालला होता. या टँकरमध्ये २९ हजार लिटर अॅसिटीक अॅसीड होते. या टँकरमधून अॅसिड गळती होत असल्याचे लक्षात आल्यावर चालक रविंद्र शिवाजी म्हस्के(वय ३१, रा. सावरगाव , ता. आष्टी, जि. बीड) याने ताबडतोब टँकर बाजूला घेतला. पावणे दहाच्या सुमारास त्याने शंभर नंबरला फोन करुन कळवले.
Video : चांदणी चौक येथे अॅसिड गळती; नागरिकांना डोळे चुरचुरण्याचा त्रास!
धोकादायक रसायनांची वाहतूक करणाऱ्या चालकांना योग्य प्रशिक्षण नसेल तर मोठी दुर्घटना घडू शकते. एवढ्या मोठ्या गाडीमध्ये एकच चालक होता.आपत्कालीन परिस्थितीत काय करायचे? या रसायनाला कसे हाताळायचे? गळती झाल्यास काय करायचे याबद्दल त्याला काहीच माहित नव्हते. नफा कमावण्याच्या नादात मालक मंडळी अनेकांचे जीव धोक्यात घालतात. सुदैवाने दुर्घटना टळली असली तरी प्रशिक्षित कर्मचारी नसतील तर जनतेला त्याची मोठी किंमत मोजावी लागेल हे या घटनेतून स्पष्ट होते.
पुणे : चांदणी चौकात ऍसिडगळती; वाहतूक वळवली
अग्निशमन दलाचे कोथरुड स्टेशन अधिकारी गजानन पाथ्रुडकर म्हणाले की, ''अग्निशमन दलाला टँकरमधील अॅसिड गळतीची माहिती कळताच त्यांनी एकीकडे त्यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून माती टाकायला सुरुवात केली. दुसरीकडे अमोनियम बायकार्बोनेट मागवला. नँशनल केमिकल लॅबरोटरीने तातडीने त्याची चाळीस पन्नास पोती उपलब्ध करुन दिली. जेथे गळती होत होती. तेथे आम्ही ते टाकले. त्यामुळे अॅसिडमुळे तयार होणाऱ्या वायुचे रुपांतर अमोनिया वायुत झाले. त्यामुळे तीव्रता कमी झाली. अॅसिटीक अॅसिडमुळे हवेत अॅसिटीक हवा तयार होवून वातावरणात पसरली असती तर लोकांचे डोळे, फुफ्फुस यांना त्रास झाला असता.''
- शाळा सुरु झाल्यावर मुलांचे कसे होणार? पालकांनो, चिंता करु नका कारण...
''अग्निशमन दलाचे जवान तातडीने घटनास्थळी आले आणि परिस्थिती नियंत्रणात आणली म्हणूनच आम्ही सुरक्षित आहोत. आम्ही त्यांचे आभारी आहोत'', अशी भावना स्थानिक रहीवाशांनी व्यक्त केली.
- हिंजवडी पोलिसांच्या 'त्या' मेसेजमुळे बांधकाम व्यावसायिकांमध्ये परसली घबराट
चालक म्हस्के म्हणाले की,मी शंभर नंबरला फोन केला. आमच्या गाडीत गँसचा बाटला, हेल्मेट, जॅकेट होते. दरम्यान टँकरमधून गळती कशी सुरु झाली, त्यामागे काय कारण आहे, अशा रसायनाची वाहतूक करताना घ्यावयाची काळजी, सुरक्षा साधने सोबत होती का ? आदी बाबींची माहिती वारजे पोलिस घेत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.