येरवडा येथील सराईत गुन्हेगार गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे.
पुणे - येरवडा येथील सराईत गुन्हेगार गुन्हेगारांच्या टोळीवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी प्रतिबंधित कायद्यानुसार (मोका) कारवाई करण्यात आली आहे. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.
निलेश उर्फ पिन्या संजय साळवे ( वय 21.रा. येरवडा), ओमकार उर्फ डब्या विनोद जगधने (वय २१, रा. यशवंत नगर, येरवडा), निखिल उर्फ पप्प्या संदीप साळवे (वय २०) अशी 'मोका' नुसार कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, निलेश साळवे व त्याचे साथीदार हे पोलिसांच्या अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. त्यांच्या नावावर मालमत्ता व शरीराविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत. साळवे व त्याच्या साथीदारांनी येरवडा व परिसरात दहशत निर्माण केली आहे. त्यांनी संघटितपणे व वैयक्तिकपणे खुनाचा प्रयत्न, गंभीर दुखापत, राहते घरातील चोरी, मालमत्ते विषयक जाळपोळ करून आगळीक करणे, बेकायदेशीरपणे हत्यारे जवळ बाळगणे, यांसारखे गंभीर व हिंसक गुन्हे केले आहेत.
त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केलेली असतानाही त्यांनी त्याचे उल्लंघन करून गुन्हे केले आहेत. या सगळ्या प्रकाराची दखल घेऊन येरवडा पोलिसांकडून संबंधित आरोपींवर "मोका"नुसार कारवाई करावी याबाबतचा प्रस्ताव तयार करून पोलिस उपायुक्त रोहिदास पवार यांच्यामार्फत अतिरिक्त पोलिस आयुक्त नामदेव चव्हाण यांच्याकडे पाठविण्यात आले. दरम्यान, चव्हाण यांनी या प्रस्तावास मान्यता दिली. पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी मागील पाच महिन्यात "मोका"ची १८ कारवाई केली आहे, तर आतापर्यंत ८१ "मोका"ची कारवाई केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.