Katraj Atikraman: कात्रज चौकातील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई!

Katraj : इमारतीच्या फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन अंतर यामधील कारवाईही करण्यात आली |
Katraj Atikraman: कात्रज चौकातील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई!
Updated on

Katraj Chauk: कात्रज चौकामध्ये असणाऱ्या अतिक्रमाणावर गुरुवारी (ता. १३) कारवाई करण्यात आली. महापालिका आयुक्त यांच्या आदेशानुसार, उपायुक्त अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मूलन विभाग व महापालिका सहाय्यक आयुक्त धनकवडी सहकार नगर क्षेत्रीय कार्यालय तसेच कार्यकारी अभियंता बांधकाम विकास विभाग झोन २ यांच्या नियंत्रणाखाली कात्रज चौक, संतोषनगर व परिसरात असणाऱ्या अनधिकृत हातगाडी, पथारी व्यवसायधारकांवर ही कारवाई करण्यात आली. तसेच, इमारतीच्या फ्रंट मार्जिन व साईड मार्जिन अंतर यामधील कारवाईही करण्यात आली.

Katraj Atikraman: कात्रज चौकातील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई!
Katraj Navale Bridge Road : कात्रज-नवले पूल रस्ता होणार तरी कधी? संथ कामामुळे नागरिक त्रस्त

सदर कारवाईच्या वेळी धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त राजेश गुर्रम, विभागीय अतिक्रमण अधिकारी उपअभियंता चंद्रकांत राऊत, क्षेत्रीय अतिक्रमण निरीक्षक उमेश नरुले, अतिक्रमण निरीक्षक श्रीकृष्ण सोनार, किरण डवरी, सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक व परिमंडळ क्रमांक ३ व परिमंडळ क्रमांक ५ कडील तसेच कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालयाकडील २१ सहाय्यक अतिक्रमण निरीक्षक यांचे संपूर्ण कर्मचाऱ्यांसह अतिक्रमण निर्मूलनाची कारवाई करण्यात आली. यामध्ये २ स्टॉल, ६ हातगाडी, १२ काऊंटर, ५२ प्लास्टिक कॅरेट, १५ भाजी पथारी, १२ फळ पथारी, ४६ लोखंडी जाळी व ५ इतर कारवाया करण्यात आल्या.

Katraj Atikraman: कात्रज चौकातील अतिक्रमणावर महापालिकेकडून कारवाई!
Katraj Ghat : कात्रज घाटामध्ये पुन्हा एकदा वनवा ; दरवर्षी उन्हाळ्यात कात्रज घाटात वनवा लागण्याची घटना

या कारवाईत कात्रज चौक रिकामा करण्यात आला. सदर कारवाईसाठी एकूण १० ट्रक, ४८ बिगारी सेवक, २१ एमएसएफ जवान व महापालिकेकडील पोलीस कर्मचारी तसेच भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांच्यासह ४ वरिष्ठ अधिकारी व १५ कर्मचारी कारवाईसाठी उपस्थित होते.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.