वाघोली (पुणे) : वाघोलीत आज पुन्हा आठ रुग्णांची भर पडली. तर केसनंद मध्ये आणखी एका रुग्णाची भर पडली. आज बाधित असलेल्या आठ रुग्णांपैकी पाच रुग्ण एकाच कुटुंबातील आहेत. तर दोन एका कुटुंबातील आहेत. वाघोलीचे माजी उपसरपंचही बाधित झाले. वाघोलीतील रुग्णांची संख्या 53 झाली आहे. तर दुसरीकडे लोणीकंद पोलिसांनी 424 पेक्षा जणांवर मास्क न घातल्या प्रकरणी दंड वसूल केला. त्यामुळे वाघोलीकरांनो आता तरी मास्क वापरा असे म्हणायची वेळ आली आहे.
वाघोलीतील लोहगाव रोडवरील एका सोसायटीमध्ये राहणाऱ्या एकाच कुटुंबातील पाच बधितांवर दोन दिवसापासून शहरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची आज वाघोलीत नोंद झाली. ते काही दिवसांपूर्वीच बाहेर गावावरून आल्याचे कळते. आजच्या दोन बाधित तरुणी आधीच्या बधितांच्या संपर्कातील आहेत. तर माजी उपसरपंच हेही कोरोना बाधित झाले. या सर्वांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर वेगवेगळ्या कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. वाघोलीत बाधितांची संख्या 53 झाली असून 22 रुग्ण ठणठणीत बरे झाले आहेत. 31 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
वाघोली प्राथमिक केंद्र अंतर्गत एकूण 7 गावे आहेत. सात पैकी वडगाव शिंदे वगळता 6 गावात रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील एकूण रुग्ण संख्या 69 असून त्यातील 28 रुग्ण ठणठणीत बरे झाले असून 40 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. केवळ मांजरी येथील एका रुग्णांचा मृत्यू झाला आहे. वाघोली प्राथमिक आरोग्य केंद्रात समावेश असलेल्या सात ही गावांनी विशेष काळजी घेण्याची गरज आहे.
मास्क वापराने कोरोनापासून बचाव होतो. वाघोलीतील रुग्ण संख्या बघता प्रत्येकाने मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र 425 जणांवर कारवाई करावी लागली हा निष्काळजीपणाच म्हणावा लागेल. असा निष्काळजी पणा नागरिकांनी करू नये. तसेच विनाकारण फिरू नये अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल.
- प्रताप मानकर, पोलीस निरीक्षक, लोणीकंद पोलीस ठाणे.
पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
कोरोनाला रोखण्यासाठी मास्क वापरणे गरजेचे आहे. मात्र अनेक जण ते वापरत नसल्याचे दिसून येते. यासाठी प्रत्येक नागरिकाने एक कोरोना योद्धा बनून मास्क वापरण्याची जनजागृती करायला पाहिजे. कोरोना वरील नियंत्रणासाठी प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे. -डॉ वर्षा गायकवाड, डॉ नागसेन लोखंडे, प्राथमिक आरोग्य केंद्र, वाघोली.
गावे एकूण रुग्ण, कंसात बरे झालेले व अॅक्टिव्ह रुग्ण
1) वाघोली - एकूण रुग्ण - 53 ( बरे झालेले - 22 ) - ( अॅक्टिव्ह - 31 )
2) केसनंद - एकूण रुग्ण - 4 ( बरे झालेले - 2 ) ( अॅक्टिव्ह- 2 )
3) कोलवडी - एकूण रुग्ण - 1 ( अॅक्टिव्ह- 1 )
4) मांजरीखुर्द - एकूण रुग्ण - 8 ( बरे झालेले - 4 ) - ( अॅक्टिव्ह - 3 ) ( मृत्यू - 1 )
5) आव्हाळवाडी - एकूण रुग्ण - 1 ( अॅक्टिव्ह - 1 )
6) निरगुडी - एकूण रुग्ण - 2 ( अॅक्टिव्ह - 2 )
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.