पुणे - गणेश विसर्जन मिरवणुकीत साउंड सिस्टीमच्या भिंती उभारून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाई करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांकडून ध्वनी पातळी तपासण्यासाठी (नॉईज लेवल मीटर) १२६ पथके तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.