Startup : व्यवसायवृद्धीला बूस्टर देणारे ‘ॲडबनाओ’ स्टार्टअप

मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, इंग्रजीसह दहा भारतीय भाषांमधील १० लाखांहून अधिक क्रिएटिव्ह ‘ॲडबनाओ’ या स्टार्टअपकडे आहेत.
Startup
StartupSakal
Updated on
Summary

मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, इंग्रजीसह दहा भारतीय भाषांमधील १० लाखांहून अधिक क्रिएटिव्ह ‘ॲडबनाओ’ या स्टार्टअपकडे आहेत.

पुणे - फोटो, व्हिडिओ, जीआयएफ असा क्रिएटिव्ह कंटेंट तयार करणे प्रत्येकासाठी सोपे काम नाही. त्यासाठी वैयक्तिक तसेच व्यावसायिक पातळीवर ग्राफिक डिझायनर किंवा व्हीडिओ एडिटरची नेमणूक करणे सर्वांनाच, विशेषतः छोट्या व्यावसायिकांना परवडणारे नसते. असा क्रिएटिव्ह कंटेंट निर्माण केल्यानंतर त्याचे मार्केटिंग करणे हेही खर्चिकच काम.

खासगी व्यक्तींपासून व्यावसायिकांपर्यंत अनेकांना भेडसावणारी ही अडचण सोडविण्यासाठी आणि त्यांना ब्रँडिंगमध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी उद्योजक नरेंद्र फिरोदिया आणि सुमीत कटारिया यांनी ‘ॲडबनाओ’ (AdBanao) या स्टार्टअपची स्थापना केली आहे.

मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, इंग्रजीसह दहा भारतीय भाषांमधील १० लाखांहून अधिक क्रिएटिव्ह या स्टार्टअपकडे आहेत. मोबाइल ॲप्लिकेशनद्वारे फोटो, व्हिडिओ, जीआयएफ असा क्रिएटिव्ह कंटेंट तयार करून तो सोशल मीडियावर पाठविण्याची सेवा भारत तसेच परदेशातील २० लाखांहून अधिक वापरकर्त्यांना हे स्टार्टअप पुरवत आहे.

स्टार्टअपचे कार्यालय अहमदनगर व पुण्यात असून सुमारे १०० कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत आहे. कटारिया आणि फिरोदिया हे दोघेही मूळचे अहमदनगर शहरातील आहेत. फिरोदिया यांना विविध व्यवसायांतील वीस वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे. कटारिया यांनी माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात प्रदीर्घ काळ काम केले आहे.

स्टार्टअप नेमके काय करते?

शंभरहून अधिक प्रकारच्या व्यवसायांसाठी तसेच त्यातील शेकडो उपप्रकारच्या व्यवसायांसाठी हे ॲप उपयुक्त ठरत आहे. केवळ पोस्टच्या निर्मितीवर न थांबता, मार्केटिंग कसे करायचे याचे शिक्षण तसेच जागृतीही आम्ही या ॲपद्वारे व्यावसायिकांमध्ये करत आहोत. इन्फ्लुएन्सर मार्केटिंग काय असते, सोशल मीडियावर कोणते हॅशटॅग वापरायचे, कंटेंट क्युरेशन काय असते, याची माहिती रीलच्या स्वरूपात आम्ही दिली आहे. व्हॉट्सॲप स्टिकर ही संकल्पनाही आम्ही उपलब्ध करून दिली आहे. लोगो, फोटो व नावासह कोणीही आपले स्वतःचे स्टिकर बनवून ग्राहकांना किंवा मित्र, नातेवाइकांना शुभेच्छा पाठवू शकतात. तसेच राजकीय पक्षाच्या नेते, कार्यकर्त्यांसाठीही विशेष कंटेंट, हॅशटॅग आणि कॅप्शन आम्ही एआय तंत्रज्ञानाच्या साह्याने उपलब्ध करून दिली आहे.

स्टार्टअपची स्थिती :

  • एकूण वापरकर्ते - २० लाख

  • नवीन वापरकर्त्यांची भर - ३०००

  • देशभरात विविध शहरांत ऑन ग्राउंड सपोर्टसाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती

ॲपची वैशिष्ट्ये

  • लीड जनरेशनसाठी (व्यवसायवृद्धी) पूरक माहिती

  • आरजे, व्हाइस-ओव्हर आर्टिस्टच्या आवाजातील जिंगल्स निर्मिती

  • जिंगल्ससह पार्श्वसंगीताच्या साह्याने ॲनिमेटेड इमेज (जीआयएफ), व्हिडिओची निर्मिती

  • लोगो नसल्यास केवळ व्यवसायाचे नाव टाकून लोगो निर्मिती

  • डिजिटल बिझनेस कार्ड (मिनी संकेतस्थळ) सुविधा उपलब्ध

क्रिएटिव्ह पोस्ट बनविण्याचे कौशल्य व्यावसायिकांकडे नसते व त्यामुळे ते त्या स्वरूपाचे सॉफ्टवेअर वापरण्यास उत्सुक नसतात. मोबाईलवर सहजरीत्या, स्थानिक भाषेत तसेच एक किंवा दोन क्लिकमध्ये पोस्ट निर्मिती करून मिळाली, तर अशा व्यावसायिकांना ते पाहिजे असते. ही गरज लक्षात घेऊन आम्ही हे ॲप विकसित केले.

- नरेंद्र फिरोदिया, सुमीत कटारिया

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.